ट्विटरवरील #पुन्हानिवडणूक वादात

महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेलं असताना, कलाकारांकडून #पुन्हानिवडणूक असं ट्विट करण्यात येतंय

Updated: Nov 15, 2019, 03:08 PM IST
ट्विटरवरील #पुन्हानिवडणूक वादात title=

मुंबई : सध्या ट्विटरवर सुरू असलेल्या पुन्हा निवडणूक या हॅशटॅशवरून (#पुन्हानिवडणूक) वाद सुरू झालाय. हा हॅशटॅग चालवणारे कलाकार भाजपच्या आयटी सेलशी संबंधित असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. राजकीय कारणांसाठी हे झालं असेल तर ते दुर्दैवी असल्याचं सावंतांनी म्हटलंय.

महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेलं असताना, कलाकारांकडून #पुन्हानिवडणूक असं ट्विट करण्यात येतंय. 

अभिनेत्री सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अकुंश चौधरी, सिद्धार्थ जाधव अशा अनेक कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन #पुन्हा निवडणूक असं एकच हॅशटॅग वापरुन ट्वीट केलंय...


झी स्टुडिओच्या 'धुरळा' सिनेमाची स्टारकास्ट

आणि हे सर्व कलाकार झी स्टुडिओच्या आगामी धुरळा या सिनेमात झळकणार आहेत. त्यामुळे #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग झी स्टुडिओचा 'धुरळा' हा सिनेमासाठी हे प्रमोशन असल्याचं स्पष्ट होतंय. झी स्टुडिओचा हा सिनेमा राजकीय घडामोडींवर आधारित आहे.