मुंबई : हरनाझ संधूच्या मेहनत आणि आत्मविश्वासामुळे भारताने तब्बल 21 वर्षांनी 'मिस युनिवर्स'चा किताब जिंकला. जेव्हा हरनाझला तो ताज घातला तेव्हा सर्व भारतीयांसाठी तो गर्वचा क्षण होता. याआधी अभिनेत्री सुष्मिता सेन आणि लारा दत्तमुळे भारताने 'मिस युनिवर्स'चा किताब जिंकला. खऱ्या अर्थात सांगायचं झालं तर 'मिस युनिवर्स' जिंकल्यानंतर हरनाझचा प्रवास सुरू झाला.
'मिस युनिवर्स'च्या ताजसोबत तिला अनेक महागडे भेट वस्तू देण्यात आल्याचं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मिस युनिवर्स हरनाझ संधूला मिळालेल्या भेटवस्तूंची यादी तुम्ही वाचली तर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. हरनाझला न्यूयॉर्कमध्ये एक घर भेटवस्तू म्हणून देण्यात आलं आहे.
मिस युनिवर्स हरनाझ संधूला मिळालेल्या भेटवस्तू
1. मिस युनिवर्सचा मुकूट - हरनाझने कमवलेल्या मिस युनिवर्सचा मुकूटाची किंमत जवळपास 50 डॉलर म्हणजे 37 कोटी रूपये आहे. हा मैल्यवान मुकूट हरनाझ 2022 पर्यंत स्वतःकडे ठेवू शकते.
2. मिस युनिव्हर्स पुरस्काराची रक्कम - हरनाज संधूला मिस युनिव्हर्सचा किताब जिंकण्यासाठी 2,50,000 डॉलर म्हणजेच 1.89 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे.
3. न्यूयॉर्कमध्ये घर - मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यावर स्पर्धकाला न्यूयॉर्कमध्ये राहण्यासाठी अपार्टमेंट दिले जाते. त्यात हरनाज वर्षभर राहणार आहे. त्यात राहण्याचा सर्व खर्च मिस युनिव्हर्स संस्थेकडून केला जाणार आहे.
4. वर्ल्ड टूर: मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर हरनाझ वर्ल्ड टूर करू शकते. यामध्ये ब्युटीशिअनपासून ते न्यूट्रिशनिस्ट आणि स्किन केअरपर्यंत सर्व प्रकारची सुविधा हरनाझला मोफत दिली जाणार आहे.