हरियाणाची मानुषी छिल्लर झाली 'मिस इंडिया'

फेमिना मिस इंडिया २०१७ चा पुरस्कार हरियाणाच्या मानुषी छिल्लरने जिंकला आहे. रविवारी २५ जून रोजी मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये आयोजित स्पर्धेत ३० राज्यांच्या सुंदरींना मागे टाकत 'मिस हरियाणा' मानसुषी चिल्लरने मिस इंडियाचा ताज आपल्या नावावर केला आहे.

Updated: Jun 26, 2017, 03:52 PM IST
हरियाणाची मानुषी छिल्लर झाली 'मिस इंडिया' title=

मुंबई : फेमिना मिस इंडिया २०१७ चा पुरस्कार हरियाणाच्या मानुषी छिल्लरने जिंकला आहे. रविवारी २५ जून रोजी मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये आयोजित स्पर्धेत ३० राज्यांच्या सुंदरींना मागे टाकत 'मिस हरियाणा' मानसुषी चिल्लरने मिस इंडियाचा ताज आपल्या नावावर केला आहे.

मेडिकलची विद्यार्थिनी असलेली मानुषी छिल्लरला गेल्या वर्षीची विजेता राहिलेली प्रयदर्शिनी चटर्जीने ताज घातले. मिस इंडियाचा पुरस्कार जिंकल्यानंतर मानुषी आता चीनमध्ये होणाऱ्या मिस वर्ल्ड २०१७ च्या स्पर्धेत मानुषी आता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मानुषीला मिस इंडियासोबत मिस फोटोजेनिकचा पुरस्कार मिळवला आहे.