हरलीन मानवर सोशल मीडिया फिदा, अनेकांनी दिल्या भलत्याच प्रतिक्रिया..

कादाचीत हा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या फोनमध्येही पोहोचला असेल. पंजाब पोलिसांची वर्दी घातलेली छायाचित्रातील ही महिला अनेकांचे लक्ष वेधून घेतल आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 22, 2017, 07:06 PM IST
हरलीन मानवर सोशल मीडिया फिदा, अनेकांनी दिल्या भलत्याच प्रतिक्रिया.. title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. जो तुम्ही बातमीच्या सुरूवातीलाच पाहिला असेल. कादाचीत हा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या फोनमध्येही पोहोचला असेल. पंजाब पोलिसांची वर्दी घातलेली छायाचित्रातील ही महिला अनेकांचे लक्ष वेधून घेतल आहे. तसेच, वर्दीवर झळकणाऱ्या पाटीवर 'हरलीन मान' अशी अक्षरे दिसत आहेत. काय आहे या फोटोचे वास्तव..... 

शेअर, लाईक्स आणि कमेट्सचा पाऊस.....

फोटो पाहून अनेकांना असे वाटत आहे की, ही महिला पंजाब पोलिसांची एसएचओ आहे. तर, या महिलेचा पोलिसवाला लूक आणि सौदर्य पाहून अनेकजण क्लिन बोर्ड झाले आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोवर शेअर आणि लाईक्स, कमेंटचा अक्षरश: पाऊस पडत आहे. फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअॅप आदींवर या फोटोने धुमाकूळ घातला आहे.

अनेकांचा कलेजा खलास

सोशल मीडियावरील कमेंट पाहता या फोटोने अनेकांचा कलेजा खलास केला आहे. अनेकजण गुन्ह्याची कबूली देत आहेत. तर, अनेक जन या महिला पोलिसाने आपल्याल अटक करावी अशी प्रतिक्रीया देत आहेत. सेल्या नावाचा एक यूजर लिहितो, 'हरलीन मान , पंजाब पोलीस, स्वत:ला अटक करून घेण्यासाठी लोक लाईनमध्ये उभे आहेत.' राकेश तिवारी नावाचा यूजर लिहितो, 'हरलीन मान, पंजाब पोलिस, कृपा करून मला अटक कर, मी आत्मसमर्पण करायला तयार आहे.'

काय आहे फोटोमागचे व्हायरल सत्य?

सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेली ही पोलिसवाली कोणी खरीखुली पोलीस नाही. तर, प्रत्यक्षात ती एक अभिनेत्री असून, कायनात अरोरा असे आहे. तिने हा फोटो आपल्या आगामी चित्रपट 'जग्गा ज्यूंदेई'मधल्या एका भूमिकेदरम्यान काढला आहे. या अभिनेत्रीने या आधी ग्रॅण्ड मस्ती आणि खट्टा-मीठा यांसारख्या हिंदी चित्रपटातही काम केले आहे.

कायनात अरोराने दिली प्रतिक्रीया

दरम्यान, हा फोटो व्हायरल होताच कायनात अरोराने प्रतिक्रीया दिली की, लोकहो.. हरलीन मान हे माझ्या आगामी चित्रपट जग्गा ज्यूंदोईमधील भूमिकेचे नाव आहे. हा केवळ एक चित्रपट आहे. हो फोटो पाहून अनेकजन अनेक प्रतिक्रीया देत आहेत. पण, मी काही पोलिस नाही. गेले तीन दिवस हा फोटो भलताच व्हायरल होत आहे. पण, तुम्ही समजता तसे काहीच नाही.

कायनातची प्रतिक्रीया पाहून लोकही समजून गेलेत की या फोटोमागचे व्हायरल सत्य काय आहे. पण, या व्हायरल फोटोमुळे तिच्या आगामी चित्रपटाला चांगला फायदा होऊ शकतो अशी शक्यता आहे.