सहकलाकारापासून जोडीदारापर्यंत; राणादा-पाठकबाईच्या लग्नाला 365 दिवस पूर्ण, विशेष पोस्ट पाहिली का?

Akshaya Deodhar and Hardik Joshi Marriage Anniversary: अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी 2022 मध्ये लग्न केले. आज त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पुर्ण झालं आहे. त्यामुळे त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सर्वत्र चर्चा आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Dec 2, 2023, 07:55 PM IST
सहकलाकारापासून जोडीदारापर्यंत; राणादा-पाठकबाईच्या लग्नाला 365 दिवस पूर्ण, विशेष पोस्ट पाहिली का?  title=
Hardik joshi and akshaya deodhar 1st wedding anniversary photos shared by couple

Akshaya Deodhar and Hardik Joshi Marriage Anniversary: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाची. राणादा आणि पाठकबाई ही महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. 2016 साली आलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून त्यांनी केलेल्या भुमिका या प्रचंड गाजल्या होत्या. त्यानंतर त्यांना पाठकबाई आणि राणादा या नव्यानं ओळखले जाऊ लागले. आजही प्रेक्षक हे त्यांना विसरलेले नाहीत. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आपले अनेक व्हिडीओही पोस्ट करताना दिसतात. मध्यंतरी ते दोघंही जेजुरीला गेले होते. त्यांचे जेजुरीचे व्हिडीओ आणि फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. 

पडद्यावरील राणादा आणि पाठकबाईंनी रिअल लाईफमध्येही लग्न केले. यावेळी म्हणता म्हणता त्यांच्या लग्नाला एक वर्षही झाले आहे. यावेळी हार्दिकनं लिहिलं आहे. ''तु माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं गिफ्ट आहेस. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.'' यावेळी अनेक सेलिब्रेटींनी त्यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षया देवधरनं लिहिलं आहे की, 'माझा नवरा, माझा जोडीदार, माझा प्रियकर आणि माझा जिवलग मित्र असल्याबद्दल खूप धन्यवाद. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.' सध्या त्यांच्या या गोड पोस्टमुळे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे त्या दोघांची बरीच चर्चा ही रंगलेली आहे. 

हेही वाचा : गोल्डन बिकीनी, काळाकुट्ट ड्रेस अन्; मसाबा गुप्ताचा इतका हॉट लुक की करीनाही जेलस? कमेंट करत म्हणाली...

अभिनेता हार्दिक जोशी काही दिवसांपुर्वी 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही मालिकाही प्रचंड गाजली. आता त्याची झी मराठी वाहिनीवरील नवी मालिका जाऊबाई गावात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या नव्या मालिकेची त्यांच्या प्रेक्षकांनाही उत्सुकता लागून राहिली आहे. सोशल मीडियावरही त्या दोघांचे असंख्य फॉलोवर्स आहेत. हार्दिक जोशी सध्या स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतूनही दिसतो आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या दोघांच्याही लग्नाचे फोटो हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. सध्या असे अनेक सेलिब्रेटी आहेत जे विवाहबंधनात अडकताना दिसत आहेत. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. नुकतेच अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जावदे यांचा विवाहसोहळा पार पडला होता.