Hardeek Joshi Post Eknath Shinde : सध्या इरसालवाडीतील दुर्घटनेमुळे तिथल्या काही ग्रामस्थांना आपले प्राण गमावावे लागले असून त्यांचे संसारही उद्धवस्त झाले आहेत. गेले काही दिवस महाराष्ट्रात धुवांधार पाऊस बसरला होता त्यामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी पाणी भरले होते व दरवर्षी प्रमाणे त्यांचे जनजीवन हे विस्कळीत झाले होते. या पावसाचा परिणाम म्हणून इरसालवाडी डोंगराकडील भागाचा मोठा दरडाचा भाग कोसळला आणि एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे या ग्रामस्थांच्या नशीबी एक महाभयानक काळरात्र आली होती. त्यातून कोणी सावरतंय तर कोणी अजूनही आशा लावून आहे आणि आपल्या हरवलेल्या प्रियजनांना ते परत भेटतील. सध्या या सर्व ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे यासाठीही अनेक हात पुढे सरसावले आहेत. यावेळी या दुर्घटनाग्रस्तांना भेटायला व घटलेल्या घटनेची पाहणी करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: इरसालवाडीत पोहचले होते. व त्यांनीही दुर्घटनेची पाहणी केली आणि सोबतच मदतकार्याचीही योग्य ती पाहणी केली व ग्रामस्थांची विचारपूस केली.
सध्या या घटनेच्या पार्श्वभुमीवर अनेक हात मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. सोबतच काही कलाकारांनीही मदतीसाठी हात पुढे केले आहेत. त्याचसोबत अनेकांनी या घटनेवर आपले दु:खही व्यक्त केले आहे. सध्या यादरम्यान अभिनेता हार्दिक जोशी यांची एक पोस्ट सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते आहे. त्यामुळे या पोस्टची सर्वत्र चर्चा आहे यावेळी त्यानं मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांना थॅक्यू म्हणत हार्दिकनं त्याचं कौतुक केलं आहे. यावेळी त्यानं नक्की काय लिहिलंय याबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. यावेळी सगळंच जण त्यांच्या पोस्टचं कौतुक करताना दिसत आहेत. त्यामुळे त्याची ही पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. यावेळी त्यानं काय म्हटलं हे आपण या लेखातून समजून घेणार आहोत.
हेही वाचा - केरळमध्ये सापडलेला 'हा' मासा पाहून 'टायटॅनिक' फेम लिओही झाला आश्चर्यचित; पाहा काय म्हणाला
यावेळी त्यानं आपल्या इन्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''रायगड जिल्ह्यातील इरसालवाडी येथे दरड कोसळली आहे. ही बातमी मुख्यमंत्री साहेबांना कळताच ते घटनास्थळी पोहचले आहेत. व स्वत: सर्व परिस्थिती आणि व्यवस्थापन बघितले. इतक्या तातडीनं काम करणारे हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची नक्कीच नोंद होईल''
''खरा नेता तोच, जो तळमळीनं संकटकाळी धावून जातो, आपुलकीनं विचारपूर करतो, धीर देतो आणि आपले उत्तरदायित्त्व समजून ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता रस्त्यावर उतरलेल्या मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सलाम''. इरसालवाडीच्या दुर्घटनेत आत्तापर्यंत 26 जणांना मृत्यू झाला आहे. 81 जण अजूनही बेपत्ता आहेत. सध्या सर्व परिस्थिती हाताळण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे.