'कांतारा' चित्रपट चर्चेत असताना 'हर हर महादेव'नं पहिल्याच दिवशी केली धमाकेदार कमाई!

'हर हर महादेव'नं बॉलिवूडलाही टाकले मागे

Updated: Oct 27, 2022, 12:22 PM IST
'कांतारा' चित्रपट चर्चेत असताना 'हर हर महादेव'नं पहिल्याच दिवशी केली धमाकेदार कमाई! title=

मुंबई : दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) 'कांतारा' (kantara) या चित्रपटाचं नाव सध्या सर्वांच्याच ओठावर आहे. कन्नडमध्ये चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर निर्मात्यांनी तो इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. हिंदीतील (Hindi) 'कांतारा' (kantara) हा चित्रपट 14 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल झाला. या चित्रपटानं सगळ्यांना वेड लावलं. 'कांतारा' चित्रपट हा चर्चेत असताना दिवाळीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबरला अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर राम सेतू (Ramsetu) आणि अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर थँक गॉड (Thank God) हे चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांसोबत मराठी चित्रपट 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा चित्रपट प्रदर्शित झाला. 'हर हर महादेव' या मराठमोळ्या चित्रपटानं 'राम सेतू' आणि 'थॅंक गॉड' या चित्रपटांना कमाईच्या बाबतीत टक्कर दिली आहे. हरहर महादेव या चित्रपटानं देखील धमाकेदार कमाई केली आहे. 

अभिजित देशपांडे यांचा हा चित्रपट संपूर्ण भारतात हिंदीतही प्रदर्शित होणार झाला. आजकाल हिंदी प्रेक्षक ज्या प्रकारचा कंटेट पाहत आहेत, त्या प्रकारात 'हर हर महादेव' हा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. मराठी-हिंदीसोबतच हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित झाला. 'हर हर महादेव'नं पहिल्याच दिवशी 2.25 कोटींची कमाई केली. हा चित्रपट 400 चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्याचे 1200 शो झाले आहेत. आता विकेंड जवळ येत असल्याचे पाहता चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

'हर हर महादेव' ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे एकेकाळचे सरसेनापती बाजी प्रभू देशपांडे यांची कथा आहे. चित्रपटात सुबोध भावेनं छत्रपती शिवाजी महाराजांची तर शरद केळकरने बाजी प्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. दिग्दर्शक अभिजित देशपांडे हे मराठीतलं मोठं नाव आहे, तर शरद केळकरचं हिंदीत चांगलीच फॅन फॉलोइंग आहे. बाजी प्रभू देशपांडे यांच्या मुघलांविरुद्धच्या लढ्याची संपूर्ण कथा ही या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट मराठीतच नव्हे तर हिंदीतही प्रेक्षकांच्या मनात उत्साह भरून टाकणारा विषय असल्याचे निर्माता-दिग्दर्शकाचे मत आहे. चित्रपटाच्या या ऐतिहासिक कथेत 300 मराठा योद्धे 12 हजार मुघल सैनिकांशी लढा देतात आणि जिंकतात. या युद्धात मराठा सैन्याचं नेतृत्व बाजी प्रभू देशपांडे यांच्याकडे होते. (Har Har Mahadev box office collection day 1 kantara raj thackeray akshay kumar ram setu ajay devgn thank god) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दक्षिणेकडील चित्रपटांनंतर कन्नडच्या 'कांतारा'नं ज्याप्रकारे हिंदी प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे, त्यावरून हिंदी प्रेक्षकांना चांगली कथा पाहिजे, मग ती भाषा कुठलीही असो हे सगळ्यांना कळले आहे. 'हर हर महादेव'चे चित्रीकरण भव्य पद्धतीनं करण्यात आले असून त्याची ऐतिहासिक कथा आहे. अशा परिस्थितीत 'कांतारा' नंतर 'हर हर महादेव' हिंदीतही देशभक्तीमुळे चर्चेचा विषय ठरला आहे.