Happy Birthday Rajinikanth : आज बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत, जे स्वतःच्या बळावर आणि मेहनतीवर यशाच्या उच्च शिखरावर पोहोचले आहेत. एवढंच नाही, तर असे अनेक कलाकार आहेत जे उभरत्या कलाकारांच्या प्रेरणास्थानी आहेत. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सुपरस्टार रजनीकांत (rajinikanth). अनेक सिनेमांत तगडी भूमिका बजावत रजनीकांत यांनी चाहत्यांच्या मनात घर केलं. रजनीकांत यांचा डान्स, अभिनय, डॉयलॉग बोलण्याची कला इत्यादी गोष्टींमुळे ते आजही चर्चेत असतात. पण एकेकाळी रजनीकांत त्यांच्या रिलेशनशिपमुळे देखील तुफान चर्चेत आले. (rajinikanth birthday wishes)
पत्नी लता यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी रजनीकांत यांच्या आयुष्यात एक महिला होती. पण त्यांचं नातं टिकू शकलं नाही. रजनीकांत यांच्या 'द नेम इज रजनीकांत' या पुस्तकात त्यांच्या जीवनातील अनेक पैलू लेखकाने उलगडले आहेत. ज्यामुळे रजनीकांत यांचं पहिलं प्रेम सर्वांना कळालं. (rajinikanth birthday song)
रजनीकांत जेव्हा बंगळुरूमध्ये कंडक्टर म्हणून काम करत तेव्हा ते एका मुलीच्या प्रेमात पडल्याचं पुस्तकात लिहिलं आहे. रजनीकांत यांना त्या मुलीसोबत लग्न करायचं होतं, पण ते होऊ शकले नाही. कारण ते प्रेम नसून फक्त आकर्षण असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर रजनीकांत यांनी दुसऱ्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली. (rajini birthday song ringtone download)
पण त्या मुलीने रजनीकांत यांचा लग्नाचा प्रस्ताव मान्य न करता त्यांचा अपमान केला. ती मुलगी म्हणाली, 'तो सावळ्या वर्णाचा असून एखाद्या ठगासारखा दिसतो...' असं म्हणत त्या मुलीने रजनीकांत यांचा अपमान केला.
पण उशीराने का होईना, खऱ्या प्रेमाची एन्ट्री प्रत्येकाच्या आयुष्यात होते. त्या मुलीने रजनीकांत यांना नकार दिल्यानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात लता यांची एन्ट्री झाली. रजनीकांत आणि लता यांची लव्हस्टोरी देखील प्रचंड खास आहे. (rajinikanth meme templates)
रिपोर्ट्सनुसार, 1980 मध्ये लता कॉलेज मॅगझिनसाठी रजनीकांत यांची मुलाखत घेण्यासाठी आल्या आणि सुपरस्टारला त्यांच खरं प्रेम भेटलं. पहिल्या नजरेतच रजनीकांत लता यांच्या प्रेमात पडले. तेव्हा एका क्षणाचाही विलंब न करता मुलाखत संपल्यानंतर रजनीकांत यांनी लता यांना प्रपोज केलं. (happy birthday wishes )
लता यांनी देखील रजनीकांत यांच्या प्रेमाला होकार दिला. त्यानंतर लता आणि रजनीकांत यांनी 1981 साली लग्न केलं. दोघांना ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन मुली आहेत. आयुष्यात प्रचंड खस्ता खाल्ल्यानंतर रजनीकांत आज आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. (happy birthday thalaiva)