मुंबई : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर आपल्या अभिनयासाठी लोकप्रिय आहेत.
त्याबरोबरच त्यांची डायलॉग डिलिव्हरी देखील प्रेक्षकांना अधिक पसंद आहे. नानांच्या डायलॉग डिलिव्हरीची टायमिंग अतिशय भावते. त्यामुळे नाना बॉलिवूड असो वा मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय आहेत. 1 जानेवारी 1951 रोजी नाना पाटेकर यांचा जन्मदिवस. यंदा नाना 67 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. नाना लवकरच प्रेक्षकांसाठी "आपला मानूस" हा सिनेमा घेऊन येत आहेत.
नाना पाटेकर अॅक्टिंगमध्ये तर माहिर आहेतच पण ते उत्तम जेवण देखील बनवतात. नाना स्वतः सांगतात की, ते चांगलं जेवण बनवू शकतात. एवढंच नाही तर नाना आपल्या मित्र परिवारासाठी स्वतः जेवण तयार करतात. एका मुलाखतीत नानांनी स्वतः सांगितले होते की, ते एक उत्तम कुक आहेत. नाना इच्छा असेल तर खूर चांगल जीवन जगू शकतात मात्र ते स्वतः एका छोट्या घरात राहणं पसंद करतात.
तसेच नाना स्वतः एक एनजीओ देखील चालवतात. त्या एनजीओ मार्फत शेतकरी, नदी संवर्धन आणि गरजूंना मदत केली जाते तसेच यांच्यासाठीच खास काम करतात. एवढंच नाही तर नाना स्वतः विधवा शेतकरी महिलांना मदत देखील करतात. हे आपण पाहिलंच आहे. नाम फांऊडेशनद्वारे नानांनी आतापर्यंत अनेकांना मदत केलं आहे. करिअरबद्दल बोलायचं झालं तर मुझफ्फर अली यांचा सिनेमा गमनमध्ये त्यांनी छोट्या रोलपासून सुरूवात केली आहे. त्यांना एन चंद्रा यांच्या अंकुश आणि विधु विनोद चोपडा यांच्या परिंदापासून ओळख मिळाली. 1991 मध्ये रिलीज झालेल्या क्रांतिवीर या सिनेमापासून चांगली ओळख मिळाली.
त्यांनी यशवंत, वजूद, युगपुरूष, गुलाम ए मुस्तफा सारख्या सिनेमांमध्ये प्रमुख अभिनेता म्हणून काम केलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी प्रहार या सिनेमांत दिग्दर्शकाची देखील भूमिका पार पाडली आहे. तसेच खामोशी, यशवंत, अब तक छप्पन , अपहरण, वेलकम आणि राजनिती सारख्या सिनेमांत अभिनय केला आहे. नॅशनल अॅवॉर्डबरोबरच नानांनी फिल्मफेअर अवॉर्ड देखील आपल्या नावे केला आहे. त्यांच्या वाढदिवसादिवशी झी चोवीस तासच्या वेब टीमकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा