Happy Birthday : 'बाहुबली'साठी प्रभासने आकारलं घसघशीत मानधन

आकडा ऐकून तुमच्याही उंचावतील भुवया  

Updated: Oct 23, 2019, 11:03 AM IST
Happy Birthday : 'बाहुबली'साठी प्रभासने आकारलं घसघशीत मानधन title=

मुंबई : 'जिओ रे बाहुबली...' अनेक तरूणींच्या मनातील ताईद असलेला 'बाहुबली' फेम प्रभासचा आज वाढदिवस आहे. प्रभासने ४०व्या वर्षात पदार्पण केले आहे. बाहुबलीनंतर त्यांच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. शिवाय त्याच्या 'साहो' चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर दमदार कमाई केली. प्रभासने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर समस्त चाहत्यांच्या मनात घर केले आहे. 

एका वेळी फक्त एकाच चित्रपटात काम करणारा बाहुबली इतर कलाकारांपेक्षा वेगळा आहे. १ हजार ५०० कोटींपर्यंत मजल मारलेल्या 'बाहुबली' चित्रपटाची शूटींग तब्बल ५ वर्ष सुरू होती. यादरम्यान त्याने कोणत्याही अन्य चित्रपटांचे काम हाती घेतले नव्हते. 

या पाच वर्षांमध्ये त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स देखील आल्या. परंतु त्या बाहुबली चित्रपटामुळे त्या ऑफर्स स्वीकारल्या नाहीत. बाहुबली चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दाक्षिणात्य कलाविश्वतून आलेला प्रभास संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला. 

बाहुबलीच्या भूमिकेसाठी त्याला सुमारे २५ कोटी रूपयांचं मानधन मिळलं होतं. तर या चित्रपटानंतर त्याच्या मानधनाच्या आकड्यातही कमालीची वाढ झाली. प्रभास आता एका चित्रपटासाठी तब्बल ३० कोटी रूपये मानधन घेतो. 

चित्रपटाला मिळालेल्या दमदार यशानंतर निर्मात्यांनी त्याला दिड कोटी रूपयांचं जिमचं साहीत्य भेट स्वरूपात दिलं आहे. प्रभासने तेलुगू 'इश्वर' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. 

त्यानंतर त्यांने 'राघवेंद्र', 'वर्षम', 'एक निरंजन', 'रेबेल', 'बाहुबली: बिगनिंग', 'बाहुबली: द कन्कलूजन', आणि 'साहो' चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारून एक वेगळा इतिहास रचला आहे.