Happy Birthday Arjun: ...म्हणून खासगी आयुष्यामुळेच अर्जुन जास्त चर्चेत

२६ जून १९८५ मध्ये अर्जुनचा जन्म सिनेविश्वातील नामवंत कपूर कुटुंबात झाला.

Updated: Jun 26, 2019, 08:46 AM IST
Happy Birthday Arjun: ...म्हणून खासगी आयुष्यामुळेच अर्जुन जास्त चर्चेत title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने अभिनय क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर यशाचे शिखर गाठणाऱ्या या कलावंताने ३४व्या वर्षात पदार्पण केले आहे. २६ जून १९८५ मध्ये अर्जुनचा जन्म सिनेविश्वातील नामवंत कपूर कुटुंबात झाला. प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांचा तो मुलगा.
 
अर्जुनने 'इश्कजादे' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. त्याच्या या पहिल्या चित्रपटाने चाहत्यांची मने जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपट हिट ठरला. चित्रपटातील गाण्यांना चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर सर्वात्कृष्ट पदार्पण (अभिनेता) पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Our New York pap chapter be on alert now we have so many celebs out there. You might just snap them at Central Park arjunkapoor #malaikaarora #airportdiaries #viralbhayani viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

अर्जुन-मलायकाच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र रंगताना दिसतात. तर अर्जुन त्याच्या कथित गर्लफ्रेंड मलायकासह न्यूयॉर्कमध्ये आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे. त्याचप्रमाणे या दोघांच्या लग्नाच्या चर्चां देखील चाहत्यांमध्ये होत असतात.   

अर्जुन त्याच्या खासगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेत राहिला. मग ते सावत्र बहिणींसोबतचे त्याचे नाते असो किंवा सलमानच्या बहिणीसोबतचं त्याचं प्रेमप्रकरण अर्जुनचे नाव 'दबंग' अभिनेता सलमान खानची बहिण अर्पितासह सुद्धा जोडण्यात आले होते. हे दोघे दोन वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. त्यांचं हे नातं जास्त काळ टिकलं नाही. 
कारण अर्जुन सलमानला घाबरत असल्यामुळे तो त्यांच्या नात्या बद्दल सलमानला काही सांगू शकला नाही. सलमानने अर्जुनला बॉडी बिल्डिंगची ट्रेनिंग दिली होती. ज्यामुळे अर्जुनचे तब्बल ५० किलो वजन कमी झाले होते.