मुंबई : संगीताच्या दुनियेत नाव कमावणारे गुलशन कुमार त्यांच्या सुरुवातीच्या काळात वडिलांबरोबर ज्युस विकायचे. नंतर गुलशन कुमार टी सीरीज या प्रसिद्ध संगीत कंपनीचे निर्माते झाले. 12 ऑगस्ट 1997ला मुंबईच्या अंधेरीमध्ये गुलशन कुमार यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं.
दरियागंजमध्ये ज्युस आणि ऑडिओ कॅसेट विकली
५ मे १९५६ रोजी दिल्लीच्या दर्यागंज भागात गुलशन कुमार यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच ते खूप महत्वाकांक्षी होते. ते लहानपणापासून त्याच्या वडिलांच्या फळांच्या रसाच्या गाडीवर आपल्या वडिलांना हात भार लावायचे ते वडिलांसोबत स्वतः रस विकत असत. पंजाबी कुटुंबातील गुलशन कुमार मोठे झाल्यावर त्यांनी ऑडिओ कॅसेटची विक्री करण्यास सुरवात केली. ऑडिओ कॅसेट व्यवसाय त्यांनी सेट केला. लोकांची मागणी पाहून त्यांनी स्वतःच कॅसेट बनवण्याचं काम सुरू केलं.
संगीत कंपनी आणि बॉलिवूडशी कनेक्शन
दिल्लीतून बाहेर पडलेल्या गुलशन कुमार यांनी 1970 मध्ये नोएडा येथे ऑडिओ कॅसेट बनवण्याची एक संगीत कंपनी उघडली आणि त्या कंपनीला सुपर कॅसेट इंडस्ट्री असं नाव दिलं. नंतर ते बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज होती आणि यासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर त्यांनी आपल्या कंपनीचे नाव बदलून टी सिरीज ठेवलं. त्यांनी बॉलिवूड गायकांशी जवळून काम करण्यास सुरवात केली. त्यांच्या रीमिक्स गाण्यांच्या कॅसेटना लोकं विकत घेण्यासाठी गर्दी करु लागले.
भजनांमधून प्रसिद्धी मिळाल्यानंतर अंडरवर्ल्डच्या नजरेत आले
गुलशन कुमार यांनी स्वत: हून गायलेल्या भजन कॅसेट बाजारात आणल्या. 80-90 च्या दशकात त्यांच्या कॅसेट आणि भजन घरां-घरांत पोहोचलं. संगीत जगात गुलशन कुमार यांचं नाव होवू लागंलं. याच दरम्यान, गुलशन कुमार यांच्यावर अंडरवर्ल्डची नजर पडली. मुंबईचे प्रख्यात पत्रकार एस हुसेन जैदी यांनी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमवर लिहिलेल्या माय नेम इज अबू सलेम या पुस्तकात अबू सालेम यांनी गुलशन कुमार यांच्याकडे खंडणी मागितली होती असं लिहीलं आहे.
अबू सलेम यांने एकल्या गुलशन कुमारच्या किंचाळ्या
१२ ऑगस्ट 1997 रोजी अबू सलेमच्या शूटर राजाने गुलशन कुमारला मुंबईच्या अंधेरी भागात गोळ्या घालून ठार मारलं. खुना होण्या अगोदर गुलशन कुमार जितेश्वर महादेव मंदिरात पूजा करून परत येत होते. त्यानंतर शूटर राजाने गुलशन कुमारच्या अंगावर 16 गोळ्या झाडल्या. त्यांने अबु सलेमलाही गुलशनकुमारची किंचाळी ऐकायला फोन लावला होता. या घटनेचा उल्लेख 'माय नेम इज अबू सलेम' या पुस्तकात केला आहे.