'गली बॉय' सिनेमाचं ‘दूरी’ गाणं प्रदर्शित

‘दूरी’ असे बोल असलेले हे गाणे खुद्द रणवीरने गायले आहे.

Updated: Jan 28, 2019, 02:58 PM IST
'गली बॉय' सिनेमाचं ‘दूरी’ गाणं प्रदर्शित title=

मुंबई: अभिनेता रणवीर सिंग स्टारर सिनेमा 'गली बॉय'चे दुसरे गाणे प्रदर्शित झाले.‘दूरी’ असे बोल असलेले हे गाणे खुद्द रणवीरने गायले आहे. जावेद अख्‍तर आणि डिवाइन या दोघांच्या लेखणीतून हे गीत साकारण्यात आले आहे. विशेषत:हे गाणे गरीब लोकांच्या आयुष्यावर बेतलेले आहे. गरीबीत आयुष्य व्यतीत करत आसलेल्या लोकांची मजबूरी या गाण्याच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. पैश्याची कमतरता त्यामुळे येणारे नैराश्य, काहीतरी वेगळे करण्याची इच्छा अणि मध्ये येते ती गरीबी. झोपडीत राहणाऱ्या लोकांचा चेहरा गण्याच्या माध्यमातून समोर  आला आहे.

‘अपना टाइम आएगा’ या गण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले. या गाण्यामध्ये सुद्धा गरीब भागात राहणारे स्ट्रीट रॅपर कशा प्रकारे संघर्ष करतात आणि याच संघर्षाच्या बळावर उंच झेप घेण्याची इच्छा मनात कायम ठेवणाऱ्या रॅपरची गोष्ट या गाण्याच्या माध्यमातून दिसत आहे. स्ट्रीट रॅपर विवियन फर्नांडिज आणि नावेद शेख यांच्या खऱ्या जीवनावर आधारित 'गली बॉय' हा सिनेमा आहे.

‘मेरी गली में’ या गाण्याचे लेखन रॅपर डिवाइन आणि रॅपर नैजी यांनी केले. सध्या हे  दोघे गाण्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. ‘मेरी गली में’ या गाण्याने सुद्धा चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. 'गली बॉय' सिनेमा 14 फेब्रुवारीला सिनेमागृहात दाखल होणार आहे.