'गली बॉय' सिनेमाने जमवला एवढ्या कोटींचा गल्ला

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर सिनेमा 'गली बॉय' यशाच्या शिखरावर आहे. दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने चांगलीच मजल मारली.

Updated: Feb 24, 2019, 05:37 PM IST
'गली बॉय' सिनेमाने जमवला एवढ्या कोटींचा गल्ला  title=

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर सिनेमा 'गली बॉय' यशाच्या शिखरावर आहे.  सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १९ कोटींचा गल्ला जमवला तर दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाईचा आकडा घसल्याचे दिसले होते.  प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सिनेमाने १३.१० कोटी रुपयांचा गल्ला जमवला .  दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने चांगलीच मजल मारली. ट्रेट अॅनलिस्ट तरण आदर्शने सिनेमाच्या कमाईचा आकडा ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे.  

दहा दिवसांच्या कमाईमध्ये सिनेमाने पहिल्या दिवशी १९ कोटींपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवशी सिनेमाने १३.१० कोटींचा गल्ला जमवला आणि शनिवारी सिनेमाने १८.६५ कोटींपर्यंत झेप घेतली. दुसऱ्या आठवड्यात सुध्दा सिनेमा चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. दुसऱ्या आठवड्यात सोमवारी सिनेमाने ८.६५ कोटी, मंगळवारी ८.०५ कोटी, बुधवारी ६.०५ कोटी, गुरूवारी ५.१० कोटी, शुक्रवारी ३.९० कोटी तर शनिवारी ७.०५ कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. एकूण मिळून सिनेमाने दोन आठवड्यात १११.२५ कोटी रूपयांपर्यंत मजल मारली आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. सिनेमाच्या कमाईचा आकडा बॉक्स ऑफिसवर दिवसोंदिवस वाढत आहे. 'गली बॉय' सिनेमा देशभरात एकूण ३३५० सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला आहे.

'गली बॉय' सिनेमा दिग्दर्शक झोया अख्तरच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सिनेमा ठरला आहे. याआधी झोया दिग्दर्शित सिनेमा 'दिल धड़कने दो' ने 76.88 कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. त्यानंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेमाने 90.27 को़टी रूपयांपर्यंत मजल मारली होती. आता येणाऱ्या दिवसांत सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती रुपयांची मजल मारतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.