Good News : 39 वर्षाची 'ही' अभिनेत्री झाली आई

कोण आहे ही अभिनेत्री 

Good News : 39 वर्षाची 'ही' अभिनेत्री झाली आई  title=

मुंबई : बलिवूडमध्ये जसा लग्नाचा सिझन आहे तसा गुड न्यूजचा देखील ट्रेंड आहे. बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जी आपल्या फिटनेसची खूप चांगली काळजी घेते. त्यात फिटनेसने या 39 वर्षाच्या अभिनेत्रीची गरोदर असल्याची बातमी लपवायला मदत केली. या अभिनेत्रीने बेबी बॉयला जन्म दिल्याच आता समोर येत आहे. ही अभिनेत्री आहे गुल पनाग. गुल पनाग या दिवसांत सोशल 

सोशल मीडियापासून बाळाला ठेवलं दूर 

गुल पनाने 6 महिन्यांपूर्वी आपल्या मुलाला निहालला जन्म दिला आहे. आणि तिने ही गोड बातमी सगळ्यांपासून लपवली होती. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत गुल पनाग सांगते की, मी आणि ऋषीने कायमच आमची प्रायव्हसी सांभाळली आहे. आई - वडिल होणं हा खास अनुभव आहे. यासाठी आम्ही याला सोशल करू इच्छित नाही. आमच्या कुटुंबातील आणि अगदी जवळच्या मित्र परिवाराला निहाल बद्दल माहित होतं पण आम्ही त्याला मुद्दामून सोशल मीडियापासून लांब ठेवलं आहे.

 

Happy #nationallipstickday !

A post shared by Gul Panag (@gulpanag) on

प्री मॅच्युर झालं बाळ गुल पनागने पुढे सांगितलं की, ती आणि तिचा नवरा आता आई - बाबांची भूमिका पार पाडण शिकत आहे. गुल बाळंतपणानंतर पुन्हा एकदा आपल्या फिटनेसच्या रुटीनमध्ये व्यस्त झाली आहे. गुलने सांगितलं की, निहाल हा वेळेच्या अगोदर झाला होता. त्यामुळे त्याचं वजन कमी होतं.