'ही' गोंडस चिमुरडी आज आहे बॉलिवूडमधील सुपरहिट अभिनेत्री, या अभिनेत्याला करतेय डेट

अभिनेत्रीने आपला बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमधील गोंडस चिमुरडी आपल्या वडिलांच्या मांडीत दिसत आहे. बघा तुम्हाला ओळखता येते का? 

Updated: Aug 27, 2022, 09:33 PM IST
'ही' गोंडस चिमुरडी आज आहे बॉलिवूडमधील सुपरहिट अभिनेत्री, या अभिनेत्याला करतेय डेट title=
guess who kiara advani unrecognize in childhood photo on social media entertainment gossips and entertainment news

Guess Who: सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातील फोटो आणि व्हिडीओच ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशीच एक सुपरहिट आणि प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करणारी अभिनेत्रीने आपला बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमधील गोंडस चिमुरडी आपल्या वडिलांच्या मांडीत दिसत आहे. बघा तुम्हाला ओळखता येते का? 

पहचान कौन!

या अभिनेत्रीच्या प्रेमाच्या चर्चाही आजकाल सगळीकडे सुरु आहे. अजूनही ओळखू नाही आली ही अभिनेत्री. जर काही जणांनी ओळखलं असेल तर ज्यांनी ओळखलं नाही त्यांना आम्ही सांगतो की, ही गोंडस, सुंदर चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून कियारा अडवाणी आहे. या तिचा बालपणीचा फोटो असून कियारा वडील जगदीप अडवाणी यांच्या मांडीवर बसली आहे. (treading news guess who kiara advani unrecognize in childhood photo on social media entertainment gossips and entertainment news)

कियारा अडवाणीने काही काळापूर्वी तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'डॅडी गर्ल्स फॉरएव्हर... हॅपी बर्थडे पापा.' यासोबतच हार्ट आयकॉनही तिने शेअर केला होता. कियारा अडवाणी सध्या सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे. दररोज हे दोघे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात आहे. कियारा 'जुग्जुग जिओ' या चित्रपटात दिसली होती. याआधी कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया 2'मध्ये ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)