Guess Who : 'या' फोटोतील राजकिय नेत्याला ओळखलंत का?

Guess Who :  या फोटोत हा नेता तरूण, तडफदार आणि डॅशिंग दिसत आहे. एका आलिषान कारमध्ये बसून त्याने हा फोटो काढला आहे. यामध्ये त्याने व्हाईट शर्ट परिधान केले आहे, आणि ड्रायव्हिंगच्या सीटवर बसून तो गाडी चालवताना दिसत आहे. हा फोटो ब्लॅक अॅन्ड व्हाईट आहे. या फोटोत तो खुपच डॅशिंग दिसत आहे. 

Updated: Feb 6, 2023, 01:59 PM IST
Guess Who : 'या' फोटोतील राजकिय नेत्याला ओळखलंत का?  title=

Guess Who :  सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे (Stars Photo) किंवा राजकिय नेत्यांचे (Politicians) काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता एका महाराष्ट्रातील राजकिय नेत्याचा व्हायरल होत आहे. या राजकिय नेत्याचा (political leader) तरूणपणातला हा फोटो आहे. या अभिनेत्याला तुम्हाला ओळखायचे आहे. (guess the political leader in photo maharashtra politics) 

फोटोत काय?

फोटोत तुम्ही पाहू शकता हा फोटो राजकिय नेत्याच्या (political leader) तरूणपणातला फोटो आहे. या फोटोत हा नेता तरूण, तडफदार आणि डॅशिंग दिसत आहे. एका आलिषान कारमध्ये बसून त्याने हा फोटो काढला आहे. यामध्ये त्याने व्हाईट शर्ट परिधान केले आहे, आणि ड्रायव्हिंगच्या सीटवर बसून तो गाडी चालवताना दिसत आहे. हा फोटो ब्लॅक अॅन्ड व्हाईट आहे. या फोटोत तो खुपच डॅशिंग दिसत आहे. 

कोण आहे हा राजकिय नेता?

हा तरूण मुलगा आता महाराष्ट्राच्या राजकारणातला (political leader) बडा नेता बनला आहे. या बड्या नेत्याने एका मोठ्या पक्षाला रामराम ठोकत आपला स्वत:च पक्ष उभारला होता. हा पक्ष काढून त्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भुकंपच आणला होता. तसेच मराठी भाषेच्या मुद्यावरून त्याच्या पक्षाने आंदोलने केली आहेत. ही आंदोलने यशस्वी देखील झाली आहेत.या आंदोलनासह त्याने टोल नाके बंद पाडले होते. यासह इतर अनेक प्रश्नावर त्याने आंदोलने करून यशस्वी करून दाखवली आहेत. 

दरम्यान तुम्ही जर अजूनही या राजकिय नेत्याला (political leader) ओळखू शकला नसाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो, हा राजकिय नेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आहे. राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात खुप महत्व आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाने केलेली अनेक आंदोलने आतापर्यंत यशस्वी ठरली आहेत. मग तो मराठी पाट्यांचा मुद्दा असो अथवा टोलचा. 
 
दरम्यान नुकतेच राज ठाकरे (Raj Thackeray) आजोबा झाले आहेत.त्याच्या नातवाचे नाव किआन आहे. या चिमुकल्या नातवाला घेऊन ते मध्यंतरी दिवाळीच्या दरम्यान शिवाजी पार्कवर दिसले होते. या क्षणाचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.