Guess Who : रेखा- राज बब्बरसोबत असलेल्या 'या' स्टार अभिनेत्रीला ओळखलंत का?

बॉलिवूड सिनेमांमध्ये हीट झाल्यानंतर राजकारणाकडे वळली, महाराष्ट्राच्या राजकारणात आहे सक्रीय,कोण आहे ही अभिनेत्री?

Updated: Sep 11, 2022, 08:51 PM IST
Guess Who : रेखा- राज बब्बरसोबत असलेल्या 'या' स्टार अभिनेत्रीला ओळखलंत का?  title=

मुंबई : सोशल मीडियावर स्टार अभिनेत्रीचे (Actress) अनेक फोटो व्हायरल असतात.अशाच एका अभिनेत्रीचा फोटो आता व्हायरल होत आहे. हा फोटो या अभिनेत्रीच्या लहाणपणीचा आहे. हा फोटो पाहून तुम्हाला या अभिनेत्रीला ओळखायचे आहे. तुम्हाला या अभिनेत्रीला ओळखता येतंय का पाहा.  

फोटोत काय? 
फोटोत तुम्ही पाहू शकता एक चिमुकली मुलगी बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा (Rekha) आणि अभिनेता राज बब्बर (Raj babbar) सोबत उभी आहे. ही चिमुकली मुलगी आता मोठी स्टार अभिनेत्री (Actress) आहे. या अभिनेत्रीच्या सौदर्याचे सर्वच दिवाने आहेत. या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट दिले आहेत. चित्रपटात हात आजमावल्यानंतर तिने राजकारणात प्रवेश केला आहे. सध्या ती राजकिय वर्तुळात सक्रिय आहे. इतक्या गोष्टी सांगून तुम्हाला या अभिनेत्रीची ओळख पटली असेल.  

कदाचित तुम्ही या मुलीला आतापर्यंत ओळखले असेल आणि अजून ओळखले नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की हा कलियुग चित्रपटाच्या सेटवरील फोटो आहे. जिथे ती रेखा आणि राज बब्बरसोबत (Raj babbar) 1981 च्या कलियुग चित्रपटात दिसली होती. ही मुलगी दुसरी कोणी नसून बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर आहे. या चित्रपटात या मुलीचा गोंडसपणा आणि अभिनय लोकांना पटला, मग मोठे होत ती चाहत्यांच्या गळ्यात ताईत बनली होती.  

एकेकाळी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री असलेल्या उर्मिला मातोंडकरने (Urmila matondkar) केवळ हिंदीच नाही तर मल्याळम, मराठी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. उर्मिला मातोंडकर 'मासूम', 'नरसिंहा', 'रंगीला', 'इंडियन', 'सेपरेशन', 'सत्या', 'सुंदर', 'जंगल', 'प्यार तुने क्या किया', 'भूत', 'पिंजरा', ' 'एक हसीना थी', 'कर्ज', 'दीवाना', 'जनम समझा करो', 'मनी मनी', 'बडे घर की बेटी', 'द्रोही' हे सिनेमे बिग हिटमध्ये दिसले. 

दरम्यान सध्या ती राजकारणाक सक्रिय आहे. राजकारणामध्ये ती हात आजमावण्याचा प्रयत्न करते आहे.