36 वर्षांपूर्वीचा चित्रपट, 15 दिवस मिळत नव्हते तिकीट, 2 कोटींचे बजेट कमावले इतके कोटी

मिथुन चक्रवर्ती, गोविंदा आणि संजय दत्तच्या या चित्रपटाचे 15 दिवस तिकीट मिळत नव्हते. 2 कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने त्यावेळी कोटींमध्ये केली होती कमाई. जाणून घ्या सविस्त

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 25, 2024, 07:48 PM IST
36 वर्षांपूर्वीचा चित्रपट, 15 दिवस मिळत नव्हते तिकीट, 2 कोटींचे बजेट कमावले इतके कोटी title=

Jeete Hain Shaan Se : सध्या OTT आणि मल्टिप्लेक्सच्या जमान्यात चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची क्रेझ कमी झाली आहे. एक काळ असा होता की चित्रपट फक्त थिएटरमध्येच प्रदर्शित होत होते. त्यावेळी आपल्या आवडीच्या अभिनेत्रीचे आणि अभिनेत्याचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. तिकीट खिडकीवर लांबच लांब रांगा लागत होत्या. सर्व तिकीटे विकली गेल्यावर टॉकीजच्या कट्ट्यावर हाऊसफुल्लचा बोर्ड लावला जात होता.

असाच एक चित्रपट त्यावेळी प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये त्या काळातील प्रसिद्ध 3 मोठे सुपरस्टार होते. ज्यामध्ये मिथुन चक्रवर्ती, गोविंदा आणि संजय दत्त यांचा समावेश होता. ज्यांच्या उपस्थितीने हा चित्रपट खूपच जबरदस्त बनला. 

हे आहे चित्रपटाचे नाव

मिथुन चक्रवर्ती, गोविंदा आणि संजय दत्त यांचा हा एकत्र चित्रपट होता. या चित्रपटाचे नाव 'जीते हैं शान से' असं होतं. 'जीते हैं शान से' हा चित्रपट 1988 साली प्रदर्शित झाला होता. 3 कलाकारांच्या उपस्थितीमुळे हा चित्रपट खूपच हिट झाला होता. हा चित्रपट दोन आठवडे हाऊसफुल्ल राहिला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'जीते हैं शान से' या चित्रपटाने मुंबईत सर्वात जास्त कमाई केली होती. त्यावेळी हा चित्रपट अवघ्या 2 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. त्यावेळी या चित्रपटाने 8 कोटींची कमाई केली होती. 

काय आहे चित्रपटाची कथा? 

'जीते हैं शान से' या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, गोविंदा आणि संजय दत्तसोबत 3 अभिनेत्रींचा देखील समावेश होता. ज्यामध्ये मंदाकिनी आणि विजेता पंडित यांच्या देखील मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील 'जूली जूली जोनी का दिल तुमपे आया' हे गाणे देखील प्रचंड गाजले होते. या संपूर्ण चित्रपटाची कथा ही मिथुन चक्रवर्ती, गोविंदा आणि संजय दत्त यांच्या भोवती फिरते. तिघांना देखील सर्वसामान्यांची सेवा करायची होती. पण त्याच दरम्यान दोन मित्रांमध्ये भांडण होते. त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न असामाजिक घटक करतात.