'स्वॅग से स्वागत' गाण्यावर तरुणींचा धमाकेदार डान्स, बघा VIDEO

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘टायगर जिंदा है’ या या सिनेमाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तसेच या सिनेमातील गाणीही गाजत आहेत.

Updated: Dec 24, 2017, 03:23 PM IST
'स्वॅग से स्वागत' गाण्यावर तरुणींचा धमाकेदार डान्स, बघा VIDEO title=

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘टायगर जिंदा है’ या या सिनेमाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तसेच या सिनेमातील गाणीही गाजत आहेत.

‘स्वॅग से स्वागत’ हे गाणं सुपरहिट ठरलं आहे. सलमान खान आणि कतरिना दोघांनीही या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. आता अनेकजण या गाण्यावर डान्स करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केले आहेत. 

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ DeepaDance नावाच्या यूट्यूब चॅनेलने अपलोड केलाय. दोन मुलींनी या व्हिडिओत धमाकेदार डान्स केलाय. याच महिन्यात ९ तारखेला हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून आतापर्यंत २८ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. 

दोन्ही तरूणींचा डान्स आकर्षक असल्याने या डान्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सध्या ‘टायगर जिंदा है’ची लाट असून त्या लाटेत या डान्स व्हिडिओलाही पसंती मिळत आहे.