ही भारतीय अभिनेत्री ठरली अशियातील सर्वात सेक्सी महिला

ब्रिटनंध्ये नुकत्याच झालेल्या एका स्पर्धेत प्रियांकाला अशियातील सर्वात सेक्सी महिला म्हणून निवडले गेले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 24, 2017, 03:48 PM IST
ही भारतीय अभिनेत्री ठरली अशियातील सर्वात सेक्सी महिला title=

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्ये दमदार कामगिरी केल्यावर आपला मोर्चा हॉलिवडकडे वळवला. विशेष म्हणजे हॉलिवडमध्येही ती तितक्याच आत्मविस्वासाने वावरत असून, तिथेही आपली दमदार कामगिरी ती दाखवून देत आहे. दरम्यान, ब्रिटनंध्ये नुकत्याच झालेल्या एका स्पर्धेत प्रियांकाला अशियातील सर्वात सेक्सी महिला म्हणून निवडले गेले आहे.

सलग पाचव्यांदाही अव्वलच

लंडनमधील एका बहुचर्चीत वृत्तपत्राने  '50 सेक्सिएस्ट एशियन वुमन' हा सर्व्हे केला. या सर्व्हेत क्टांडिको फेम प्रियांका चोप्रा सर्वात वरच्या स्थानावर राहिली आहे. विशेष असे की, प्रियांकाने सलग पाचव्यांदा हे स्थान मिळवले आहे. दरम्यान, 2016मध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचीही निवड अशियातील सर्वात सेक्सी महिला म्हणून झाली होती.

निवड कायम ठेवण्याचे प्रियांकासमोर आव्हान

आपली निवड करण्यासाठी मत नोंदविलेल्या सर्वा मतदारांचे आभार मानताना प्रियांकाने म्हटले आहे की,  'मी या निवडीचे श्रेय घेऊ इच्छित नाही. याचे सर्व श्रेय माजे जेनेटिक्स आणि आपल्या नजरेला जाते.' पुढे प्रियांकाने म्हटले होते की, 'मी सर्वांची आभारी आहे. हे स्थान कायम ठेवणे हे माझ्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.

प्रियांका सुंदर आणि तितकीच बुद्धीमानही

दरम्यान, 'इस्टर्न आय'चे मनोरंजन विभागाचे संपादक आणि '50 सेक्सिएस्ट एशियन वुमन'चे संस्थापक असजाद नजीर यांनी म्हटले आहे की, प्रियांका ही एक सुंदर आणि तितकीच बुद्धीमान, चांगल्या मनाची व्यक्ती आहे. या सर्व पैलूंचे एकत्रीत पैलू तिच्या व्यक्तिमत्वात आढळतात, असेही नजीर यांनी म्हटले आहे.

इतर भारतीय अभिनेत्रीही पहिल्या दहामध्ये

दरम्यान, छोट्या पडद्याजा विचार करता स्टार निया शर्मा ही दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. नियाने म्हटले आहे की, आता मला प्रियांकाइतक्या उंचिवर पोहोचायचे आहे. दरम्यान, या वेळी या सूचीत दीपिका पादुकोण तिसऱ्या तर, अलिया भट्ट चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पाचव्या तर, कतरीना कौफ आणि श्रद्धा कपूर अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत.