अरबाज खानच्या गर्लफ्रेंडच बोल्ड फोटोशूट, Photo पाहून चाहते थक्क

जॉर्जिया एंड्रियानीच्या फोटोशूट समोर बॉलिवूड अभिनेत्र्याही फेल, फोटो पाहिलेत का तुम्ही?

Updated: Oct 15, 2022, 08:49 PM IST
 अरबाज खानच्या गर्लफ्रेंडच बोल्ड फोटोशूट, Photo पाहून चाहते थक्क title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अरबाज खान (Arbaaz Khan) याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) हिची बॉलिवूडमध्ये (Bollywood) नेहमीच चर्चा असते. जॉर्जियाच्या नवनवीन फोटोशूटवरून ही चर्चा रंगत असते. त्यात आता तिचे नवीन फोटोशूट समोर आले आहे. या फोटोशूटने जॉर्जियाने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे.  

हे ही वाचा : Urfi Javed चे थ्रोबॅक फोटो आले समोर, Photo पाहून ओळखताही येणार नाही
 
जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. त्यात आता तिने नवीन फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा आहे.  

फोटोत काय? 
जॉर्जिया एंड्रियानीने (Giorgia Andriani Photo) नवीन फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये तुम्ही पाहू शकता तिने विविध पोज देऊन हे फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट पाहुन चाहते थक्क झाले आहेत. 

लुकची चर्चा 
जॉर्जिया एंड्रियानीच्या (Giorgia Andriani) फोटोशूटमधील लुकची एकच चर्चा रंगली आहे. या फोटोशूटध्ये तिने ब्लॅक ब्रालेट आणि पिंक ग्लिटर ट्राउझर्स परीधान केली आहे. हा लुक पुर्ण करण्यासाठी तिने केस कुरळे आणि मेकअप केला आहे. यासोबतच तिने हाय हिल्ससह देखील घातल्या आहेत, ज्या या फोटोशूटला ग्लॅमरस टच देतायत. 

मलायका अरोरासोबत (Malaika Arora) घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खानचे (Arbaaz Khan) नाव विदेशी ब्युटी जॉर्जिया एंड्रियानीसोबत (Giorgia Andriani) जोडले जात आहे. अनेकदा दोघेही कधी सुट्टीवर तर कधी पार्टीत एकत्र दिसतात. दुसरीकडे, जॉर्जिया अरबाजसोबतच्या (Arbaaz Khan Giorgia Andriani) अफेअरमुळे चर्चेत राहते, पण त्याहीपेक्षा ती तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे देखील चर्चेत असते. 

दरम्यान जॉर्जियाने (Giorgia Andriani) शेअर केलेले फोटो चाहत्यांना खुप आवडले आहेत. या फोटोंवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडत आहेत.