हे न्यूड पेटिंग शेअर केल्यामुळे गौरी खान झाली ट्रोल!

या पेटिंगमुळे गौरी खान झाली ट्रोल...

Updated: May 10, 2018, 10:16 AM IST
हे न्यूड पेटिंग शेअर केल्यामुळे गौरी खान झाली ट्रोल! title=

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची पत्नी गौरी खान व्यवसायाने इंटिरिअर डिझाईनर आहे. गौरी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. मुलगी सुहानासोबत अनेक फोटोज ती सोशल मीडियावर शेअर करत असते. पण आता तिने शेअर केलेल्या एका पेटिंगमुळे तिला ट्रोल करण्यात आले. गौरीने एक न्यूड पेंटिंग शेअर केले आणि लिहिले की, ब्लॅक ड्रामा. 

पेटिंग पाहताच युजर्स भडकले

पेटिंग पाहताच युजर्सनी प्रश्न विचारुन भंडावून सोडले. एका युजरने विचारले, शाहरुख, तुझ्या बायको दारू घेतली आहे का? तर एकजण म्हणाला, तुमच्या मुलांवर काय परिणाम होईल? तर एकाने म्हटले, अत्यंत वाईट आहे हे गौरी मॅम. 

painting

गौरीने शेअर केलेले पेटिंग इटलीतील सुप्रसिद्ध आर्टिस्ट रोबर्टो फेरिस यांनी पेंट केलेले आहे. यात तीन लोक आहेत आणि तिघेही न्यूड आहे. हे न्यूड पेटिंग शेअर केल्यामुळे गौरी खानला चांगलेच ट्रोल करण्यात आले. ट्रोल होण्याची गौरीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी शाहरुखच्या बर्थडेला ट्रान्सपरेन्ट ड्रेस घातल्याने तिला ट्रोल करण्यात आले होते.

काय आहे गौरी खानचे खरे नाव?

गौरी छिब्बर खानच्या जन्म ८ ऑक्टोबर १९७० मध्ये दिल्लीत झाला होता. गौरी पंजाबी असून लग्नानंतर मात्र तिने धर्मपरिवर्तन केले. गौरीच्या वडीलांचे नाव रमेश चंद्र छिब्बर आहे तर आईचे नाव सविता छिब्बर आहे. आठ वर्षांच्या अफेअरनंतर गौरी आणि शाहरुख २५ ऑक्टोबर १९९१ मध्ये विवाहबद्ध झाले. यांना आर्यन, सुहाना आणि अब्रराम अशी तीन मुले आहेत.