Gashmeer Mahajani : लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचे चर्चेत येण्याचे कारण त्याचे वडील रवींद्र महाजनी यांचे निधन होते. गेल्या 20 वर्षांपासून ते त्यांच्या कुटुंबापासून लांब राहत होते. त्यांचं कधीच शेजारच्यांशी देखील बोलणं झालं आहे. रवींद्र यांचे पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील त्यांच्या राहत्या घरात कार्डिअक अरेस्टनं निधन झाले. त्यांचे निधन झाले याची माहिती खूप उशिरा समोर आली. दरम्यान, गश्मीरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचे खुलासे केले. तर आता चाहत्यांशी संपर्क साधत असताना एका नेटकऱ्यानं गश्मीरला वडील वारल्यानंतर केस का काढले नाहीत या विषयी विचारलं. त्यावर गश्मीरनं परखड मत मांडल असून नेटकऱ्यालाच सवाल केला आहे.
गश्मीरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘Ask Gash for few minutes before I Sleep’ म्हणतं एक सेशल घेतलं. या सेशनमध्ये एका नेटकऱ्यानं गश्मीरला प्रश्न विचारला की 'वडील वारल्यावर केस कापतात, याबद्दल काय बोलाल? मला तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू ऐकायला आवडेल.' त्यावर उत्तर देत गश्मीर म्हणाला, 'मी जे काम करतो, त्यावर माझ्या कुटुंबाचे अर्थार्जन होते. टक्कल केलं असतं तर हातातून कामं गेली असती. जे माझ्यावर अवलंबून आहेत, त्यांची जबाबदारी तुम्ही घेतली असती का?'
या आधी देखील गश्मीरनं चाहत्यांशी संपर्क साधला होता त्यावेळी देखील त्याला अनेकांनी त्याच्या खासगी आयुष्याविषयी प्रश्न विचारले होते. एक नेटकरी म्हणाला होता की 'सर तुमच्या आई- वडिलांचं अरेंज मॅरेज झालं की लव्ह मॅरेज... कारण मला जाणून घ्यायला आवडेल की मधू मॅडम सारख्या एवढ्या छान व्यक्ती रवींद्र सरांच्या आयुष्यात कशा...' त्यावर उत्तर देत गश्मीर म्हणाला होता की, 'त्यांचा प्रेम विवाह होता... पण जे प्रेम होतं ते सगळं फक्त तिच्याबाजूनं होतं. ही वाईट गोष्ट आहे.'
हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेवर बायोपीक? स्वत:च साकारणार प्रमुख भूमिका?
गश्मीरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की रवींद्र यांना स्वत: ची कामं स्वत: करायला आवडायची. त्यांना मदत करण्यासाठी कोणाला कामाला ठेवले की ते दोन दिवसात त्यांना हाकलवून लावायचे. माझ्याकडे आले तरी ते स्वत: चं जेवण स्वत: बनवायचे. त्यांना कोणाची मदत घ्यायला आवडायचे नाही.