सलमान नव्हे तर, अर्पिताच्या घरी गणेशोत्सवाची धूम

संपूर्ण देशभरात गणरायाची मनोभावे सेवा करण्यात येत आहे.

Updated: Sep 3, 2019, 09:45 AM IST
सलमान नव्हे तर, अर्पिताच्या घरी गणेशोत्सवाची धूम  title=

मुंबई : सर्वत्र गणपतीची धुमधाम सुरू आहे. संपूर्ण देशभरात गणरायाची मनोभावे सेवा करण्यात येत आहे. बॉलिवूडकर देखील गणपतीच्या सेवेत मग्न झाले आहेत.बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिताच्या लग्नानंतर गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये विराजमान होणारा गणेश आता अर्पिताच्या घरी विराजमान होतो. सलमान खास बाप्पाच्या दर्शनासाठी अर्पिताच्या घरी जातो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Arpita Khan Sharma Welcomes their Eco Friendly Ganpati Bappa at her Residence in #bandra . #arpitakhansharma #ganeshchaturthi #ganpatifestival #bollywood #entertainment #photography #video #paparazzi #mumbai #yogenshah @yogenshah_s @arpitakhansharma

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

त्याचबरोबर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी खान कुटुंबीयांच्या या गणेशाचे दर्शन घेतले. सलमानच्या घरी दिड दिवसांसाठी बाप्पा विराजमान होतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये आई सलमा बाप्पांची विधीवत पूजा करताना दिसत आहे. 

अभिनेता जितेंद्र, तुषार कपूर आणि एकता कपूर यांच्या घरीही थाटात बाप्पा विराजमान झाला. आकर्षक अशी फुलांची सजावट या बाप्पासाठी करण्यात आली आहे. यावेळी तुषारची मुलं लक्ष्य आणि रवी यांनीही गणपती बाप्पाच्या आरतीत सहभाग घेतला.