'त्यानं माझ्या Private Part वर...', गंदी-बात फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

या अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी अभिनेत्रीनं तिच्यासोबत झालेल्या लैंगिक छळाविषयी सांगितले आहे. 

Updated: Feb 1, 2023, 02:35 PM IST
'त्यानं माझ्या Private Part वर...', गंदी-बात फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा title=

Actress Flora Saini : बॉलिवूड कॉमेडी चित्रपट 'स्त्री' (Stree) मध्ये दिसलेली अभिनेत्री फ्लोरा सैनीनं (Flora Saini) तिच्या आयुष्यातील काही मोठे खुलासे केले आहेत. फ्लोरा ही घरगुती हिंसाचार आणि लैंगिक छळाची शिकार झाल्याचा खुलासा तिनं केला आहे. फ्लोराच्या म्हणण्यानुसार, निर्माता गौरांग दोशीनं तिचा छळ केल्याचा खुलासा तिनं केलाय. हा धक्कादायक खुलासा करत फ्लोरा म्हणाली, गौरांग दोशीनं तिच्या प्रायव्हेट पार्टला मारलं (Punch) केलं. याविषयी फ्लोरानं 2018 साली दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता. तर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फ्लोरानं याविषयी खुलासा केला आहे. 

मोठ्या पडद्यावर फ्लोरा सैनीची ओळख आशा सैनी अशी आहे. फ्लोरानं ह्युमन्स आणि बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत तिच्यासोबत झालेल्या घरगुती हिंसाचार आणि लैंगिक छळाविषयी सांगितले आहे. इतकंच काय तर तिनं ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. फ्लोरानं सांगितले की ती 14 महिने गौरांग दोषीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. तिनं दिलेल्या माहितीनुसार, तेव्हा ती 20 वर्षांची होती आणि तिच्या करिअरच्या पीकवर होती. मात्र, त्या नात्यातील ताणतणावामुळे तिचं करिअर संपुष्टात आले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फ्लोराच्या म्हणण्यानुसार, त्याच्या क्रूर आणि भयंकर भूतकाळाचा तिच्यावर परिणाम झाला. फ्लोरा म्हणाली, "मी माझ्या आई-वडिलांसोबत राहायला सुरुवात केली. मला यातून बाहेर पडण्यासाठी अनेक महिने लागले. हळूहळू मला जे सर्वात जास्त आवडतं ते परत मिळालं आणि ते म्हणजे अभिनय. या गोष्टीला वेळ लागला, पण आज मी आनंदी आहे. मलाही प्रेम मिळालं आहे."

हेही वाचा : 'हा तर बेशरमपणा', वडिलांसमोर पतीला Kiss केल्यानं Masaba Gupta ट्रोल

2018 मध्ये, जेव्हा मनोरंजन क्षेत्रात #MeToo कॅम्पेन सुरु झालं होतं. त्यावेळी फ्लोरानं तिचा अनुभव शेअर केला होता. त्यावेळी फ्लोरानं तिच्या पालकांच्या विरोधात जात गौरांग दोशीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सुरुवात केली. फ्लोरानं सांगितले की गौरांगनं तिच्या कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडले होते आणि तिला विनाकारण मारहाणही सुरू केली होती. तिनं पुढे असेही सांगितले होते की एके दिवशी गौरांगा तिला मारणार होता, तेव्हा तिला दुसरं काही सुचत नव्हतं. अशा परिस्थितीत फ्लोरानं तिथून पळून जात स्वत: ला सावरले होते. फ्लोरा ही गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या '36 फार्महाउस' या चित्रपटात दिसली होती. तर छोट्या पडद्यावरील 'मेरे साईं' आणि OTT वर असलेल्या 'अक्कड़ बक्कड़ रफू चक्कर' मध्ये देखील दिसली होती.