'गंदी बात' फेम Anveshi Jain पुन्हा चर्चेत, फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकुळ

बोल्डनेसच्या सर्वंच मर्यांदा ओलांडल्या,अन्वेशी जैनचा लेटेस्ट फोटो पाहिलात का?

Updated: Jul 25, 2022, 01:47 PM IST
'गंदी बात' फेम Anveshi Jain पुन्हा चर्चेत, फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकुळ title=

मुंबई : अल्ट बालाजीची वेबसीरीज 'गंदी बात'मधून आपल्या बोल्ड अभिनयाने प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अन्वेशी जैन नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता पुन्हा एकदा अन्वेशी जैनने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत.  

अभिनेत्री अन्वेशी जैन साऊथ चित्रपट 'रामा राव ऑन ड्युटी'च्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये दिसली होती. या  इव्हेंटमध्ये अन्वेशी जैन सिल्क साडी परिधान करून आली होती. साडीतल्या या तिच्या लुकवर सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. 

इव्हेंटमधले तिचे फोटो आता समोर आले आहेत, हे फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत. साडीतही ती तितकीच बोल्ड दिसत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. तिच्या या फोटोंची आता खुप चर्चा रंगली आहे.

हॉटनेसच्या बाबतीत अन्वेशी जैन बॉलीवूडच्या सौंदर्यवतींनाही टक्कर देते आणि याचा पुरावा म्हणजे तिचे फोटो, जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तसेच अन्वेशीच्या स्टाईलचे लोक इतके वेडे आहेत की सोशल मीडियावर तिच्या नावाने अनेक फॅन पेजेस तयार करण्यात आली आहेत, जिथे तिचे फोटो शेअर केले जातात. 

'गंदी बात 2' मध्ये तिने खूप इंटिमेट सीन्स दिले आहेत, ज्याची खूप चर्चा झाली. ही मालिका प्रदर्शित झाल्यानंतर लोकांनी तिला गुगलवर शोधण्यास सुरुवात केली आणि ती पाहताच इंटरनेट सेन्सेशन बनली.

अन्वेशी जैन ही मध्य प्रदेशची रहिवासी आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक मॉडेल आणि होस्ट देखील आहे. तिने अनेक कॉर्पोरेट इव्हेंट्स, कॅम्पस इव्हेंट्स, चॅरिटी इव्हेंट्स आणि प्रायव्हेट पार्ट्यामध्ये होस्ट केल्या आहेत.