टायगर श्रॉफचा डान्स व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

स्टाइल आणि पिळदार बॉडीची गोष्ट आली, की हरेकाच्या मनात सर्वात आधी जे नाव येतं, ते असतं बॉलीवूडचा हार्टथ्रॉब, फिट बॉय टायगर श्रॉफचं. 

Updated: Jul 8, 2022, 08:44 PM IST
टायगर श्रॉफचा डान्स व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव title=

मुंबई : स्टाइल आणि पिळदार बॉडीची गोष्ट आली, की हरेकाच्या मनात सर्वात आधी जे नाव येतं, ते असतं बॉलीवूडचा हार्टथ्रॉब, फिट बॉय टायगर श्रॉफचं. त्याची बोलण्याची स्टाईल असो, की किलर लूक टाकत मागे वळून पाहणं त्याचे फॅन त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात. लोकं टायगरवर इतके फिदा आहेत, की  टायगरने एखादा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर तो काही मिनीटातच व्हायरल होतो.  

टायगरचे फिटनेस व्हिडिओज आणि डान्स मूव्ह्ज चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. स्वदेशी सोशल मीडिया मंच 'कू'वर टायगरचा एक नवाकोरा व्हीडिओ काही क्षणातच चाहत्यांनी उचलून धरलाय. या  व्हिडिओतल्या टायगरच्या डान्स मूव्ह्ज आजवर पोस्ट केलेल्या सगळ्या व्हिडिओजपेक्षा खूपच वेगळ्या आहेत.  

केवळ कपडं बदलणं जर इतकं सोपं असतं...  
या व्हिडियोत टायगरने दाखवलेल्या आत्तापर्यंतच्या सर्वात डान्स मूव्ह्पेक्षा जबरदस्त आहेत. यात एकदम सुरेख ठेका ऐकायला येतो. यातली खास गोष्ट काय, तर व्हिडिओच्या सुरवातीला टायगर आपली डॅशिंग बॉडी फ्लॉन्ट करतो आहे. मात्र पुढच्या काही क्षणातच एका डान्स मूव्हवरून दुसरी मुव्ह घेतानाच आधी व्हाइट सॅंडोमध्ये असलेला टायगर ब्लॅक सॅंडो घातलेला दिसतो.

हा  व्हिडिओ पाहून टायगरचा एक चाहता एकदमच भारावून गेला. टायगरची अदा पाहून तो म्हणाला, "सुपर से ऊपर' असणारा टायगरचा जलवा!"

याला टायगरचा जलवा म्हणा की स्टाइल, ती कमीच असेल. मात्र एक अजून गोष्ट इथे समोर येते की, ती म्हणजे व्हिडिओ एडिटरचं कौशल्य. इतक्या बारकाइने व्हिडिओ मर्ज करणं सोपं नाही. अगदी एक बारीकशी चूकही यात दाखवता येत नाही.