मुंबई : आयकर प्रकरणात अडकलेल्या बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आयकर विभागाचे अधिकारी सलग दुसऱ्या दिवशी अभिनेत्याच्या घरी सर्वेक्षणासाठी पोहोचले आहेत. बुधवारप्रमाणे आज देखील सोनूच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत. त्यामुळे आता सोनूच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुधवारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोनूशी निगडीत असलेल्या 6 जागांवार छापेमारी केली आहे.
सोनू सूदचे आर्थिक रेकोर्ड, उत्पन्न, अकाउंट बुक, खर्चाशी संबंधित डेटाची छाननी केली जात आहे. सोनूच्या घरी छापेमारी सुरू असल्यामुळे आम आदमी पार्टी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सोनूला पाठिंबा दर्शविला आहे. यासंबंधी त्यांनी ट्विट देखील केलं आहे.
केजरीवाल ट्विट करत म्हणाले, 'खऱ्याच्या वाट्यावर अनेक संकटं असतात. पण अखेर सत्याचा विजय होतो...' शिवाय कोरोना काळात लाखोंना मदत करणाऱ्या हिरोवर ईडीचं संकट आल्यामुळे सोनूच्या चाहत्यांना देखील दुःख झालं आहे. अनेक चाहत्यांचा सोनूला पाठिंबा आहे. पण अद्याप याप्रकरणी सोनू कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही.