18 वर्षांच्या मुलींनाही लाजवतेय 54 वर्षीय माधुरी; फिट राहण्यासाठी जपते मोलाचा मंत्र

54 वर्षीय माधुरीच्या सौंदर्यापुढे 18 वर्षांच्या मुलीही फेल...  

Updated: Nov 18, 2021, 12:01 PM IST
18 वर्षांच्या मुलींनाही लाजवतेय 54 वर्षीय माधुरी; फिट राहण्यासाठी जपते मोलाचा मंत्र  title=

मुंबई : आताच्या धकाधकाचीच्या जीवनात प्रत्येकाचं आरोग्याकडे आणि फिटनेसकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने दररोज काही वेळ स्वतःसाठी आणि आरोग्यासाठी द्यायला हवा. ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहतं. तसं पाहायला गेलं तर सेलिब्रिटी त्यांच्या फिटनेसबद्दल कायम सतर्क असतात. दिवसातले तीन-चार तास ते जीममध्ये किंवा योगा करण्यासाठी देत असतात. त्यामुळे उतरत्या वयात देखील त्यांचं आरोग्य सृदृढ असतं. आज अशाचं एका अभिनेत्रीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्या अभिनेत्रीचं नाव आहे माधुरी दीक्षित. माधुरी आता 54 वर्षांची आहे. पण तिचं सौंदर्य एखाद्या 18 वर्षांच्या मुलीला देखील लाजवेल. माधुरीचा जन्म 15 मे 1967 वर्षी मुंबईत झाला. वयाच्या 54 व्या वर्षी देखील माधुरी अत्यंत सुंदर आणि फिट आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

माधुरीच्या फिटनेस मागचं एक मोठं कारण आणि डायट प्लान आज आपण जाणून घेवू. माधुरी उठल्याबरोबर प्रथम मॉर्निंग वॉकसाठी जाते. परतल्यानंतर हलका नाश्ता करते, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी आणि प्रथिने जास्त असतात.

माधुरी दीक्षित फिट राहण्यासाठी दर 2 तासांनी काहीतरी खाते. आहारात तिने बहुतांश हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश केला आहे. याशिवाय ती दिवसभर भरपूर पाणी पिते.

Madhuri Dixit Fitness secrets and Diet Plan at this age have a look KPJ

माधुरी तिच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश नक्कीच करते. असं म्हणतात की शिमला मिरचीमध्ये फायबर असते, जे मेटाबॉलिज्म वाढवून रक्तदाब आणि हृदय नियंत्रणात ठेवते.

याशिवाय तिला उकडलेले, भाजलेले, शिजवलेले किंवा हलके तळलेले अन्न खायला आवडते. हेच कारण आहे की ती जपानी स्वयंपाक शैलीत टोफू, मिश्र भाज्या आणि मशरूम बनवते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

माधुरीला जिममध्ये जायला आवडत नाही. ती स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम, धावते. माधुरी दररोज 15 ते 20 मिनिटे योगासने करते. ती आठवड्यातून 4 ते 5 दिवस नृत्याचा (कथ्थक) सराव करते. नृत्यामुळे तिला सर्वाधिक ऊर्जा मिळते.