मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खानचं कुटुंब चर्चेत आहे. अभिनेत्री अमृता सिंग या सैफच्या पहिल्या पत्नी आहे, तर अभिनेत्री करीना कपूर खान दुसरी. अभिनेत्री सारा अली खान आणि इब्राहिम हे दोघे अमृता सिंग यांची मुलं असून तैमूर सैफ आणि करिनाचा मुलगा आहे. शिवाय करीना पुन्हा एकदा आई होणार आहे. तैमूर, सारा आणि इब्राहीम हे तिघं माझ्या ह्रदयाजवळचे असल्याचं वक्तव्य करीनाने कॉफी विथ करणच्या चॅट शोमध्ये कंले. त्याचप्रमाणे तिने सैफ अलीखानची पहिली पत्नी अमृताबद्दल देखील आपलं मत मांडलं.
मीडिया रिपोर्टनुसार करण जोहरने करीनाला आमृताबद्दल विचारलं तेव्हा करीना म्हणाली, 'त्यांची आणि माझी भेच होत नाही. मात्र मी त्यांचा खूप आदर करते. त्यांची आणि माझी भेट सारा लहान असताना झाली होती.' असं वक्तव्य तिने करणच्या शोमध्ये केलं.
दरम्यान, सुशांत सिंग राजपूत आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण चांगलचं गाजलं. यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकूल प्रीत सिंगचं देखील नाव पुढे आलं होतं. एनसीबीकडून या अभिनेत्रींची चौकशी देखील करण्यात आली आहे.
ड्रग्स प्रकरणात साराचं नाव पुढे आल्यामुळे सैफ त्याच्या मुलीवर अत्यंत नाराज असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. परंतु त्यानंतर खुद्द सैफने आपण सारावर नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिली. सैफ म्हणाला, 'मी माझ्या सर्व मुलांवर समान प्रेम करतो, मी कोणावरही नाराज नाही.' सुशांत सिंग आत्महत्या आणि बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणावर अद्यापही तपास सुरू आहे.