Ramsetu सिनेमातील Akshay Kumar चा पहिला लूक रिलीज

अक्षय कुमार लवकरच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. रामसेतू या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. आणि यासाठी नुकतीच त्याने शूटिंगलाही सुरूवात केली आहे. मात्र या सिनेमातील अक्षयच्या लूकबाबत सस्पेन्स कायम होता. 

Updated: Mar 30, 2021, 01:23 PM IST
Ramsetu सिनेमातील Akshay Kumar चा पहिला लूक रिलीज  title=

मुंबई : अक्षय कुमार लवकरच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. रामसेतू या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. आणि यासाठी नुकतीच त्याने शूटिंगलाही सुरूवात केली आहे. मात्र या सिनेमातील अक्षयच्या लूकबाबत सस्पेन्स कायम होता. 

अखेर आता स्वत: अक्षय कुमारनेच इन्स्टाग्रामवर रामसेतूमधील आपला लूक शेअर केला आहे. याशिवाय आपल्या लूकबाबत तुम्हाला काय वाटते? असा प्रश्नही त्याने आपल्या चाहत्यांना विचारला आहे. 

अक्षयने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, माझ्या आतापर्यंतच्या महत्वाच्या फिल्म्सपैकी रामसेतू आहे. त्यासाठी शूटिंगची सुरूवातही आम्ही आजपासून सुरू केली आहे. माझ्या या लूकबद्दल तुम्हाला काय वाटतं ते ही सांगा.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयच्या या प्रश्नाला त्याच्या चाहत्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. फॅन्सना अक्षयचा लूक आवडल्याचे कमेंट्समधून कळतंय. 

रामसेतू या चित्रपटात अक्षय कुमार आर्किओलॉजिस्ट म्हणजेच पुरातत्वशास्त्रज्ञाच्या भूमिकेत असणार आहे. या सिनेमाच्या मुहूर्त शूटसाठी अख्खी टीम अयोध्येत गेली होती. यावेळी अक्षय कुमारने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेटही घेतलेली.

रामसेतू सिनेमाक अक्षय कुमारसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरूचासुद्धा काम करणार आहेत.