राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या मुलीची पहिली झलक; बहिणीने शेअर केला फोटो

आपल्या सुरेल आवाजासाठी ओळखला जाणारा राहुल आणि अभिनयासाठी ओळखली जाणारी दिशा यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. 20 सप्टेंबर रोजी या  जोडप्याने त्यांच्या आयुष्यातील एका सुंदर नवीन अध्यायाची सुरुवात केली. राहुल वैद्य यांची बहीण श्रुती वैद्य हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबातील नवीन सदस्याचा पहिला फोटो शेअर केला आहे.

Updated: Sep 24, 2023, 03:26 PM IST
 राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या मुलीची पहिली झलक; बहिणीने शेअर केला फोटो  title=

मुंबई : प्रसिद्ध गायक राहुल वैद्य आणि त्याची पत्नी दिशा परमार हे दोघंही इंडस्ट्रीतील खूप मोठी नावं आहेत. आपल्या सुरेल आवाजासाठी ओळखला जाणारा राहुल आणि अभिनयासाठी ओळखली जाणारी दिशा यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. 20 सप्टेंबर रोजी या  जोडप्याने त्यांच्या आयुष्यातील एका सुंदर नवीन अध्यायाची सुरुवात केली. नुकतंच त्यांनी त्यांच्या कुटुंबात मुलीचं स्वागत केलं आहे. आता राहुलची बहीण श्रुती वैद्यने कुटुंबातील नवीन सदस्य, त्यांच्या लहान मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. हा क्षण म्हणजे राहुल आणि दिशाच्या आयुष्यातील एक नवीन सुरुवात आहे, कारण ही जोडी पालक बनल्याच्या आनंदाने भरलेले आहेत.

राहुल वैद्य यांची बहीण श्रुती वैद्य हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबातील नवीन सदस्याचा पहिला फोटो शेअर केला आहे.या फोटोत,  आजी आपल्या नातीला प्रेमाने आपल्या मिठीत घेते, तर राहुलची बहीण श्रुती वैद्य तिच्या शेजारी बसलेली दिसत आहे आणि चिमुकलीकडे प्रेमाने पाहतेय. या आनंदी प्रसंगी सर्वांनी दिलेल्या आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल आभार मानत श्रुती वैद्यने कॅप्शनमध्ये कृतज्ञता व्यक्त केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राहुल वैद्यसाठी देखील हा दिवस खास आहे. कारण त्याच्या वाढदिवसादिवशीच त्याच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं. या अविस्मरणीय प्रसंगी, त्यांने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची पत्नी दिशा परमार आणि त्याच्या लहान राजकुमारीला रुग्णालयातून घरी परत आणल्याचा आनंद होता. राहुल आपल्या प्रेमळ कुटुंबासोबत हा खास दिवस साजरा करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांची लव्हस्टोरी
राहुल आणि दिशाची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. याद तेरी गाण्याच्या सेटवर जेव्हा ते एकमेकांना भेटले तेव्हा त्यांच्यात संवाद सुरू झाला आणि त्यांच्यात एक खास बंध निर्माण झाला. जसजसा वेळ निघून गेला, तसतशी त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली आणि हे स्पष्ट झालं की त्यांना एकमेकांमध्ये काहीतरी खास सापडलं आहे. राहुलने बिग बॉस 14 मध्ये दिशाला प्रपोज केलं आणि तिच्याशी लग्न करण्यास सांगितलं.