'ते' दिवस सगळ्याच महिलांना नकोसे वाटतात; मग अभिनेत्री कसं करतात शुटींग?

काम आहे थांबून कसं चालणार? 'त्या' दिवसांत शूटींग म्हणजे अभिनेत्रींसाठीही असतो मोठा टास्क  

Updated: Dec 6, 2022, 05:41 PM IST
'ते' दिवस सगळ्याच महिलांना नकोसे वाटतात; मग अभिनेत्री कसं करतात शुटींग? title=
Finally how do actresses shoot during Periods Know in one click nz

How Actresses Shoot During Periods : मासिक पाळींच्या (Periods) दिवसांत महिलांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते. काहीजण आपल्या वेदना लपवून काम करतात तर काहींना ते करणं शक्य होत नाही. मग असावेळेस सामान्य महिलांच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की मासिक पाळींच्या दिवसांत अभिनेत्री (Actress) कसं शूट करतात? कारण त्यांचं शूटिंगचे वेळापत्रक आधीच ठरलेलं असते त्यामुळे अभिनेत्री त्या वेदनांमध्ये शूट (Shoot) कसं करतात हे आपण जाणून घेणार आहोत. जाणून घेऊया सर्व समस्यांना मागे टाकून अभिनेत्री पीरियड्ससाठी कशा प्रकारे शूट करतात. (Finally how do actresses shoot during Periods Know in one click nz)

करीना कपूर म्हणाली-

करीना कपूर (Kareena Kapoor Khan) अनेकदा मोकळेपणाने बोलताना दिसते. एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री म्हणाली की, मासिक पाळी येण्याचा अनुभव प्रत्येक महिलेसाठी वेगळा असतो. अशा परिस्थितीत तिला किती विश्रांतीची गरज आहे हे तिच्यावर अवलंबून आहे. ती म्हणाली की, अनेक महिलांना पोटदुखी असते तर काहींना भयंकर पेटके येतात. प्रत्येक कंपनीने हे समजून घेतले पाहिजे, असेही करीना कपूर म्हणाली. याआधीही करीना कपूरने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, हा आजार नाही, त्यामुळे आपण एन्जॉय करतानाच काम केले पाहिजे.

 

जया बच्चन यांच्याही अडचणी होत्या

एका पॉडकास्टदरम्यान (Podcast) बोलताना जया बच्चन (Jaya Bachchan) म्हणाल्या की, मला कामाच्या दरम्यान खूप त्रास व्हायचा. सॅनिटरी नॅपकीन (Sanitary Napkin) बदलण्यात काय अडचण आली हेही त्यांनी सांगितले. त्यांनी असेही सांगितले की, पूर्वी सेटवर आजच्यासारखे टॉयलेट नव्हते.

सुष्मिता सांगते की...

हा त्रास फक्त अभिनेत्रींनाच सहन करावा लागला नाहीतर मॉडेल्सनाही (Model) या त्रासातून जावं लागते. इंडिया टुडेशी संभाषण करताना, सुष्मिता (Sushmita Sen) सांगते की कधीकधी रॅम्प वॉक (Ramp Walk) सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी पीरियड्सचे सरप्राईज मिळायचे. अशा परिस्थितीत वेशभूषा नीटनेटका आणि स्वच्छ ठेवणे हे आपल्यासाठी मोठे आव्हान व्हायचे. तिने सांगितले की या काळात मला खूप क्रेविंग असते पण मला काहीच मिळत नाही. यामागचे कारण म्हणजे काटेकोर आहाराचे पालन करणे. 

 

सर्व अभिनेत्री त्यांचे समाधान शोधून काम करतात

सर्व अडचणींचा सामना केल्यानंतर अभिनेत्रींनी काम सुरूच ठेवले आहे. वेदना बरे करण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. जरी त्रास होत असला तरी प्रत्येक महिला त्या काळात त्या परिस्थितीवर मात करुन काम करत असते.