कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीची मोठी अपडेट समोर; प्रसिद्ध अभिनेता भावूक होत म्हणाला...

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता.

Updated: Aug 13, 2022, 09:46 PM IST
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीची मोठी अपडेट समोर; प्रसिद्ध अभिनेता भावूक होत म्हणाला... title=

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या AIIMS हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ताज्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल अनेक खोट्या बातम्याही पसरवल्या गेल्या होत्या. आता ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी कॉमेडियन सुनील पाल यांनी आपल्या मित्राच्या स्थितीचं सत्य सांगितलं आहे.

खरंतर सुनील पाल यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीची माहिती देताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये ते म्हणतायेत की, 'नमस्कार मित्रांनो, मी सुनील पाल. जसं की आपण सर्वजण राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल चिंतेत आहोत. त्यांच्याबद्दल अनेक बातम्या आणि अफवा येत आहेत. मला त्यांच्या कुटुंबाकडून ताजी माहिती मिळाली आहे. देवाच्या कृपेने तो बरा होत आहे, वेग थोडा कमी आहे, पण तो बरा होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुनील पुढे म्हणाले, 'तुम्हा सर्वांना विनंती आहे की, आपण सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, आमचा कॉमेडी किंग ज्याने या जगाला खूप हसवलं, प्रत्येक घर, प्रत्येक कुटुंब, ज्याने नेहमीच हसवलं, असा एक महान कलाकार जो नेहमी असंच म्हणाला, 'लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन' हे सिद्ध करायचं आहे...राजूभाई लवकर बरा व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना'', बुधवारी त्याला जिममध्ये हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. चाहते त्यांच्या आवडत्या स्टारच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.