...म्हणून सलमान खान फिल्म्स विरोधात तक्रार दाखल

सर्व प्रकरणाचा खुलासा सलमानने ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

Updated: May 17, 2020, 12:47 PM IST
...म्हणून सलमान खान फिल्म्स विरोधात तक्रार दाखल title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता अर्थात सलमान खान समोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.  सलमान खान फिल्म्स आपल्या आगामी चित्रपटांसाठी कास्टिंग करत असल्याच्या चर्चा सध्या तुफान रंगत आहेत. परंतु सद्य परिस्थितीत कोणत्याही चित्रपटासाठी कास्टिंग होत नसल्याचं सांगत त्याने ट्विटरच्या माध्यमातून या सर्व चर्चांना पुर्णविराम दिला आहे. या काळात फिल्म प्रोडक्शन कोणत्याही प्रकारचं कास्टिंग करत नसल्याचं आणि त्यासाठी कोणत्याही कास्टिंग एजेन्टला हायर केलं नसल्याचं त्याने ट्वीटद्वारे स्पष्ट केलं.

यासंबंधीत अभिनेता अंश अरोराने मुंबईतील एका पोलीस ठाण्यात जाऊन सलमान खान फिल्म्स विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. अंश अरेराच्या म्हणण्यानुसार त्याला  सलमान खान फिल्म्सच्या वतीने अनेक कॉल, मेसेज आणि ईमेलही आले. सलमानच्या आगामी 'टायगर जिंदा है ३' चित्रपटात त्याला नकारात्मक भूमिका देण्याबद्दल सांगण्यात आले. शिवाय ऑडिशनसोबत दिग्दर्शक प्रभुदेवासोबत मीटिंग ठेवल्याचाही उल्लेख या इमेलमध्ये करण्यात आला आहे. 

या सर्व प्रकरणाचा खुलासा सलमानने ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. 'मी किंवा सलमान खान फिल्म्स सध्या कोणत्याही चित्रपटासाठी कास्टिंग करत नाही. शिवाय आगामी चित्रपटासाठी कास्टिंग एजन्टला देखील हायर केले नाही. चुकीच्या मार्गाने माझ्या किंवा सलमान खान फिल्म्सच्या नावाचा वापर होत असेल तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.' असं स्पष्टीकरण सलमानने दिलं आहे.