बोल्ड अभिनेत्री चालते, मग खासदार का नको? एका फोटोमुळे धुमाकूळ

अतिशय बोल्ड लूक चाहत्यांना दाखवला आहे.

Updated: Dec 10, 2021, 04:03 PM IST
 बोल्ड अभिनेत्री चालते, मग खासदार का नको? एका फोटोमुळे धुमाकूळ title=

मुंबई : बंगाली चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री आणि पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँने आपल्या अभिनयाने सर्वांची मने तर जिंकलीच पण तिच्या सौंदर्याचेही लोक वेडे आहेत. त्याच वेळी, अभिनेत्री तिच्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अशा परिस्थितीत आता नुसरतने तिचा अतिशय बोल्ड लूक चाहत्यांना दाखवला आहे.

नुसरतचा बोल्ड अवतार

नुसरतने तिचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती स्पोर्ट्स ब्रामध्ये दिसत आहे आणि खूपच हॉट दिसत आहे. मात्र, हे थ्रोबॅक फोटो आहेत. आता चाहत्यांनी नुसरतच्या कौतुकाचे पूल बांधायला सुरुवात केली आहे.

काही लोक तिच्या स्टाईलची चर्चा करत आहेत, तर काही लोकांनी तिच्या फिगरचे कौतुक केले आहे. मात्र, यातील काही लोक असे आहेत ज्यांनी नुसरतला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

यूजर्सनी नुसरतचा क्लास घेतला

नुसरतला ट्रोल करताना एका यूजरने तिच्या चुकीच्या टायमिंगवरही प्रश्न केला आहे. भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देश शोक करत असताना नुसरत त्यांना श्रद्धांजली वाहण्याऐवजी असे फोटो पोस्ट करण्यात व्यस्त असल्याचे युजरचे म्हणणे आहे. त्याचवेळी आणखी एका युजरने त्यांना मी खासदार असल्याची आठवण करून दिली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुसरत वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत 

विशेष म्हणजे नुसरत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुसरत पती निखिल जैनपासून विभक्त झाल्यामुळे आणि यावर्षी मुलाला जन्म दिल्याने खूप वादात सापडली होती.

यानंतर अभिनेते यशदास गुप्ता यांना मुलाचे वडील म्हटले जाऊ लागले. आता यशसोबत ही अभिनेत्री जगासमोर आली असून, यासोबत तिने यशसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे.