नवी दिल्ली : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आमिर खान याच्या 'दंगल' सिनेमातून आपली ओळख निर्माण केलेली 'धाकड' गर्ल फातिमा सना सध्या ट्रोल होत आहे.
फातिमा सना शेखने सोशल मीडियात शेअर केलेल्या फोटोजमुळे ती सध्या ट्रोल होत आहे. झालं असं की, तीन दिवसांपूर्वी फातिमाने आपले फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोच्या कॅप्शनमध्ये फातिमाने 'शेमलेस सेल्फी' लिहीलं आहे.
फातिमाचा हा फोटो साईड पोजमध्ये घेण्यात आला आहे. ज्यामध्ये तीने साडी परिधान केली आहे. फातिमाने परिधान केलेल्या साडीची पद्धत अनेकांना आवडली नाही आणि त्यानंतर काहींनी सोशल मीडियात फातिमाविरोधात वेगवेगळ्या कमेंट्स करण्यास सुरुवात केली.
फोटोचं कॅप्शन वाचून असं वाटतं की, साडी परिधान केल्याची पद्धत चुकीची आहे असं स्वत: फातिमालाही वाटत होतं. त्यामुळे नेमकं तसचं झालं जे नेहमी होतं. फातिमाला युजर्सने सोशल मीडियात ट्रोल करण्यास सुरुवात केली.
काही महिन्यांपूर्वी फातिमा आपल्या एका फोटोमुळे ट्रोल झाली होती. रमजानच्या महिन्यात स्विमसूट परिधान करत तीने क्लिक केलेला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. फातिमा या फोटोत मालदीवमधील बिचवर ब्लॅक स्विमसूटमध्ये बसलेली दिसत आहे.
फातिमावर युजर्स नाराज होते कारण तीने तोकडे कपडे परिधान करत फोटो काढला होता. इतकेच नाही तर रमजानच्या पवित्र महिन्यात तीने असा फोटो काढल्यानेही युजर्स नाराज होते.