लेकीसाठी… शंभर गोष्टींचं पुस्तक आणि आता बडबड गीतांचे पुस्तक लिहिणारा बाबा...

बाबाचं लेकीसाठी अनोख गिफ्ट 

Updated: Nov 12, 2021, 07:50 AM IST
लेकीसाठी… शंभर गोष्टींचं पुस्तक आणि आता बडबड गीतांचे पुस्तक लिहिणारा बाबा...  title=

मुंबई : बालदिन... पंडित जवाहर लाल नेहरू यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. "मुलं ही देवाघरची फुलं" असं म्हटलं जातं. त्यांच्या चेहऱ्यावरच हसू, निरागसता पाहिली की मन प्रसन्न होत,  दिवसभराचा थकवा दूर पळून जातो. पण या लॉकडाउनच्या काळामध्ये  मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालय... शाळा बंद, मैदान बंद मग करणार तरी काय ? त्यात ऑनलाइन शाळेमुळे पर्याय नव्हता म्हणून हातात मोबाईल आलाय...

ज्या गोष्टीपासून आपण मुलांना लांब ठेवत होतो तीच गोष्ट मुलांच्या जवळ येऊ लागलीय...

मोबाइल शाप की वरदान हे ठरवणे आता चुकीचे आहे पण मोबाईलचं  लहान मुलांना व्यसन लागणे हे मात्र चुकीचंच. टीव्ही आणि मोबाईलमुळे वाचन संस्कृती कमी झाली आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल. हल्ली मुलं गोष्टी वाचत नाहीत, बडबडगीत गात नाहीत  सरळ युट्युबवर व्हिडिओ लावतात आणि त्यातून आनंद घेतात.

खरतर पालकांनी आपल्या पाल्यासाठी थोडा वेळ काढायला हवा, त्यांना जवळ घेऊन गोष्टी सांगायला हव्यात, बडबडगीत गायला हवीत. त्यांचं काम मोबाईल करू लागला तर... काही संस्कार आपल्या गोष्टींतून गाण्यांतून मुलांपर्यंत पोहोचतात आणि ती पोहोचवण्याची जबाबदारी पालकांची आहे.

'वेळ नाही' या कारणा खाली आपण बऱ्याचदा ते टाळतो. पण याच धावत्या युगातला बाबा आपल्या लेकीसाठी शंभर गोष्टींचे पुस्तक लिहितो, तिच्यासाठी या जमान्यातली बडबड गीते लिहितो  तिला जवळ बसवून गोष्टी सांगतो, बडबड गीत गातो.

तो बाबा आहे विनोद गायकर... ज्याने आपल्या लेकीसाठी म्हणजेच वेणू साठी बडबड गीतांचे पुस्तक लिहिले आहे.