'फास्टर फेणे'चा टीझर प्रदर्शित !

गेले काही दिवस अनेक मराठी सेलिब्रिटी सोशल मीडियामध्ये 'फ'ची बारखडी म्हणत, 'तो येतोय' याचे संकेत देत होते.

Updated: Sep 12, 2017, 06:39 PM IST
'फास्टर फेणे'चा टीझर प्रदर्शित !  title=

 मुंबई : गेले काही दिवस अनेक मराठी सेलिब्रिटी सोशल मीडियामध्ये 'फ'ची बारखडी म्हणत, 'तो येतोय' याचे संकेत देत होते.

नेमका हा आहे कोण? कसला धुमाकूळ घालणार आहे? या तुमच्या मनातील काही प्रश्नांना आज अखेर उत्तरं मिळणार आहेत.

रितेश देखमुख आणि झी स्टुडिओची निर्मिती असलेला 'फास्टर फेणे' या चित्रपटाचा पहिला टीझर आज रसिकांसमोर आला आहे. या चित्रपटात अमेय वाघ 'फास्टर फेणे'च्या प्रमुख भूमिकेत आहे. आदित्य सरपोतदारने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी आदित्यने 'नारबाची वाडी', 'क्लासमेट' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

 

फास्टर फेणे’हे प्रसिद्ध लेखक भा. रा. भागवत यांनी जिवंत केलेलं एक लोकप्रिय पात्र आहे. भास्कर रामचंद्र भागवत यांनी लिहिलेलं हे पात्र ६०च्या दशकात प्रचंड गाजले होते.  बनेश उर्फ फास्टर फेणेच्या रंजक कथांनी त्यावेळी अनेक लहानग्यांचं जग व्यापलं होतं. आता हे पात्र चित्रपटाच्या रूपात पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. २७ ऑक्टोबर २०१७ रोजी फास्टर फेणे प्रदर्शित होणार आहे.