फरहान अख्तर मराठमोळ्या मॉडेलसोबत बांधणार लग्नगाठ

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहे.

Updated: Jan 12, 2020, 10:14 AM IST
फरहान अख्तर मराठमोळ्या मॉडेलसोबत बांधणार लग्नगाठ title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहे. बॉलिवूडमध्ये कधी कोणाचे नाव कोणासोबत जुळेल हे सांगता नाही. त्याप्रमाणे प्रेमविरह, सोडचिठ्ठी अशा अनेक चर्चा सेलेब्रिटींमध्ये कायम रंगत असतात. अभिनेता फरहान अख्तर दोन वर्षांपूर्वी पत्नी अधुनापासून विभक्त झाला होता. परंतु या मुद्दयावर त्याने कधीही भाष्य केले नाही. 

सेलिब्रिटींच्या या मांदियाळीत गेल्या बऱ्याच महिन्यांपासून फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या जोडीवर अनेकांच्या नजरा खिळलेल्या आहेत. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच एकत्र माध्यमांसमोर आली आणि ते रिलेशनशिपमध्ये असल्याची बाब उघड झाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Merry Christmas from the Mad-Hatters#seasonsgreetings

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

आता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर जोडी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. २०२० साली शिबानी आणि फरहान लग्न करणार आहेत. शिवाय त्यांच्या कुटुंबामध्ये लग्नाची तयारी देखील जोरदार सुरू आहे. पण अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली नाही.  

फरहानचा घटस्फोट झाला आहे शिवाय त्याला दोन मुली देखील आहे. त्याच्या पत्नीचे नाव अधुना आहे. २००२ साली त्यांनी विवाह केला होता. १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तर शिबानीच्या आधी फरहान  अभिनेत्री श्रद्धा कपूरला डेट करत असल्याची चर्चा होती. पण दोघांनी कधी त्यांच्या नात्याला दुजोरा दिला नाही. 

दरम्यान, फरहान आणि शिबानीने काही दिवसांपूर्वी केलेली सोशल मीडिया पोस्ट पाहता त्या दोघांचाही साखरपुडा झाल्याच्या चर्चा आहेत. पण, त्या वृत्तालासुद्धा दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता चाहते आणि साऱ्या कलाविश्वाचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्यावर.