'या' प्रसिद्ध दिग्दर्शिकेचा पार्टीत धुमाकूळ, अभिनेत्रींसोबत केलेला डान्स पाहून युजर्स भडकले

बॉलीवूड सेलिब्रेटींच्या लग्नाच्या चर्चा खूप दिवस चालतात.

Updated: Jul 29, 2022, 08:33 PM IST
'या' प्रसिद्ध दिग्दर्शिकेचा पार्टीत धुमाकूळ, अभिनेत्रींसोबत केलेला डान्स पाहून युजर्स भडकले title=

Farah Khan Dance: आजकाल बॉलीवूड सेलिब्रेटींची एकामागून एक लग्नसराई पाहायला मिळाली होती. त्यात ऐश्वर्या, काजोल, करिनाच्या लग्नाचीही चर्चा झाली नसेल तेवढी चर्चा ही कतरिना, आलिया, प्रियंका आणि दीपिकाच्या लग्नाची झाली होती. 

खरंतर प्रत्येक वधूसाठी लग्नाचा दिवस खास असतो. मग ती सामान्य तरुणी असो किंवा बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित सुंदरी. मात्र बॉलीवूड सेलिब्रेटींच्या लग्नाच्या चर्चा खूप दिवस चालतात. असाच एका बॉलीवूड दिवाचा विवाह 2004 मध्ये झाला होता. ज्या लग्नात बॉलीवूडचे अनेक छोटे-मोठे स्टार उपस्थित होते. मेहंदी, संगीत सगळ्यांचीच लग्नात धूम होती. ती दुसरी कोणी नसून इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि डिरेक्टर फराह खान होती. जिने नुकताच आपल्या लग्नातला एक फोटो इन्टाग्रामवर पोस्ट केला आहे ज्यात फरान खान आपल्या मैत्रीणी आणि बॉलीवूडच्या आघाडीच्या हिरोईन्स प्रियंका चोप्रा आणि राणी मुखर्जीसोबत बेधुंद डान्स करताना दिसते आहे. 

कोरिओग्राफर फराह खान अनेकदा तिचे जुने फोटो शेअर करत असते. आता तिने तिच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे जो त्याच्या संगीत सोहळ्याचा आहे. या संगीतात फराहसोबत प्रियांका चोप्रा आणि राणी मुखर्जी दिसत आहेत. हा 18 वर्ष जूना फोटो शेअर करत फराहने कॅप्शनमध्ये लिहिले drunk dulhan dancing at her own sangeet (btw had to managed my duptta, necklace) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फराह खानने 2004 मध्ये शिरीष कुंद्रासोबत लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलेब्स पोहोचले होते. आता फराहही तीन मुलांची आई झाली आहे. जे आता खूप मोठे झाले आहे. फराह खान आता मोठमोठ्या सेलिब्रिटींना डान्स शिकवते तसेच डान्स रिअॅलिटी शोज जज करताना दिसते. ती एक दिग्दर्शिकाही आहे. 'मैं हूं ना' आणि 'ओम शांती ओम'सारखे हिट चित्रपट तिने दिग्दर्शित केले आहेत.