Rashmika Mandanna : 'नॅशनल क्रश' अशी ओळख असणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही तिच्या चित्रपट (Film), गाण्यांमुळे (Music) नेहमीच चर्चेत असते. हल्ली तिच्या मुंबईत (Mumbai) अनेक वाऱ्या पाहायला मिळतात. तिचे एअरपोर्ट लूक (Airport Look) नेहमीच चर्चेत असतात.
रश्मिका मंदाना तिच्या नवीन येणाऱ्या बॉलीवूड (Bollywood) चित्रपट गुडबायच्या प्रमोशनमध्ये चांगलीच बीझी आहे. त्या दरम्यान तिचे विदआऊट मेकअपचा (Without Makeup) व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. (Fans are shocked to see Rashmika Mandanna without makeup nz)
साउथला (South) तिच्या अभिनयाने भूरळ पाडल्यानंतर आता ती बॉलीवूडमध्ये 'गुडबाय' या चित्रपटातून पदार्पण करत आहे. या चित्रपटात रश्मिकासोबत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि नीना गुप्ता (Neena Gupta) हे कलाकार देखील दिसणार आहे. 'गुडबाय' हा चित्रपट 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये (Promotion) रश्मिका प्रचंड व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
मीडियाने नुकतच तिला पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये विदआऊट मेकअप कॅमेऱ्यामध्ये कैद केले. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या या लूकने चाहते घायाळ (fan) झाले आहेत. अनेक चाहत्यांनी तिच्या व्हिडीओ आणि फोटोजवर कमेंट (Comment) केले आहेत. एक चाहता लिहितो की, नॅचरल ब्यूटी. तर दूसऱ्या चाहत्याने लिहीले की- सो सिंपल.
आपण नेहमीच पाहतो की कलाकार हे विदआऊट मेकअप दिसत नाहीत आणि कोणी विदआऊट मेकअप असल्यास कॅमेरासमोर पोस देत नाही पण अशात रश्मिकाने याविरुद्ध करुन सगळ्यांची मनं जिंकलीत. चक्क रश्मिकाने विनामेकअप कॅमेरासमोर पोज दिल्या. सगळीकडे तिचे कौतूक केले जात आहेत.
'गुडबाय' चित्रपटानंतर रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रासोबत (Siddharth Malhotra) 'मिशन मजनू' आणि रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) 'एनिमल' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.