आर्यनला भर गर्दीत 'त्या'नं केलं Kiss; पाहून शाहरुखही मारेल कपाळावर हात

आर्यनचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल...

Updated: Sep 16, 2022, 03:44 PM IST
आर्यनला भर गर्दीत 'त्या'नं केलं Kiss; पाहून शाहरुखही मारेल कपाळावर हात title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan)  यांचा लाडका लेक आर्यन खान (Aryan Khan) हा लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. सध्या आर्यन सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. नुकतंच आर्यनवर पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली फिदा असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता आर्यन ट्विटरवर एका वेगळ्याच कारणामुळे ट्रेंड करत आहे. आर्यनसोबत चाहत्यानं नुकतंच असं काही केलं की नेटकऱ्यांनाही आश्चर्य झाले आहे. 

आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी

आर्यनचा हा व्हिडीओ बॉली मसाला या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आर्यनचा हा व्हिडीओ मुंबई विमानतळावरचा आहे. यावेळी एका चाहत्यानं आर्यनला लाल गुलाब दिलं. त्या चाहत्याकडून गुलाब घेतल्यानंतर आर्यननं शाहरुखप्रमाणे त्याला सलाम करत त्याचे आभार मानले. (Aryank Khan Trend On Twitter)

आणखी वाचा : नोरा, Jacqueline मागोमाग 'ही' मराठी अभिनेत्रीसुद्धा सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात, पाहा कुठे फसली

आर्यननं विमानतळावर त्याच्या चाहत्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले. त्यानंतर एका चाहत्यानं चक्क आर्यनच्या हाताला Kiss केलं. आर्यनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत त्याची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'अगदी तुझ्या वडिलांप्रमाणे सलाम.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मुंबईला आल्यावर आर्यनला एकदा बघायला मिळावे अशी माझी इच्छा आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'गौरी खानची मैत्रिण आणि अभिनेत्री नीलम कोठारी हिनेही आर्यन खानचा हा व्हिडिओ लाइक केला आहे.' (fan kissed Aryan Khan s Hands Give Red Rose Watch Viral Video Of Shah Rukh Khan Son trend on Twitter )

आणखी वाचा : Reel मध्ये डोळा मारल्यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर ऐश्वर्या यांच सडतोड उत्तर, म्हणाल्या...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : ऐश्वर्याचा 'तो' व्हिडीओ समोर येताच नेटकरी म्हणतात, 'किती तो Attitude...'

आर्यन अभिनयापासून दूर असला तरी त्याला दिग्दर्शनाची आवड आहे. शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याचा मुलगा आर्यनला लोकप्रियतेत त्याला इन्टरेस्ट नाही.  त्याला पडद्यावर नाही तर दिग्दर्शक म्हणून पडद्यामागे काम करायचे आहे. त्यामुळे आर्यन दिग्दर्शनातील बारकावे शिकत आहे. आर्यननं युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधून फिल्म आणि टीव्हीमध्ये पदवी घेतली आहे.

आणखी वाचा : 'जर तू जीन्स घातलीस तर...', राज कपूर यांचं बोलणं ऐकून मंदाकिनी थांबलीच...

आर्यन मार्शल आर्ट्स ट्रेंड आहे. तायक्वांदोमध्ये तो ब्लॅक बेल्ट आहे. आर्यन अप्रतिम डबिंग करतो. 2019 मध्ये, त्याने 'द लायन किंग' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीमध्ये सिम्बाच्या पात्राला आवाज दिला. इतकंच नाही तर 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात शाहरुखच्या बालपणीची भूमिका त्यानं साकारली होती. आर्यन 'कभी अलविदा ना कहना' या चित्रपटातही दिसला होता.