धक्कादायक : या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचे एक-दोन नव्हेतर तब्बल १३ महिलांशी शारिरीक संबध.. 

प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीच्या धोका देण्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Updated: Oct 21, 2022, 09:05 PM IST
धक्कादायक : या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचे एक-दोन नव्हेतर तब्बल १३ महिलांशी शारिरीक संबध..  title=

मुंबई : हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका जाना क्रेमरने तिच्या एक्स पतीच्या धोका देण्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. प्रसिद्ध शो रेड टेबल टॉक दरम्यान जानाने सांगितलं की, एक्स पती माइक कजिनने एक किंवा दोन नव्हे तर 13 पेक्षा जास्त महिलांसोबत फसवणूक केली होती. दोघं ही सहा वर्षे लग्नाच्या बंधनात होते. यादरम्यान माईकने तिची सतत फसवणूक केली. विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथसोबत झालेल्या संभाषणात जनाने ही धक्कादायक गोष्ट सांगितली.

जाना क्रेमरने एप्रिल 2021 मध्ये पती माईकपासून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. तिने शोमध्ये सांगितलं की, 'मला माहित आहे की, आज आम्हा दोघांची परिस्थिती चांगली आहे.' ती पुढे रडत म्हणाली, 'पण मी या वर्षाचा विचार करते. जेव्हा माझी मुलं ख्रिसमसच्या दिवशी माझ्या घरी उठणार नाहीत. यामुळे माझे मन खूप दुखेल.

जाना आणि माईकचे सहा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. दोघांना दोन मुलं आहेत. 6 वर्षांची मुलगी जोली आणि 3 वर्षांचा मुलगा जेस. ती पुढे म्हणाली, 'माझ्या कुटुंबासोबत राहण्याचं माझं स्वप्नही तू संपवलंस. हे योग्य नाही.'

माइकला होतं सेक्सचं एडिक्शन
जना क्रेमरच्या आरोपावर माईक कजिन अद्याप बोललेला नाही.  माइकलाही सेक्सचे व्यसन होतं. त्यामुळे तो २०१६ मध्ये रिहॅबमध्येही गेला होता. त्याच वर्षी जाना आणि माईक काही काळ वेगळे झाले होते. लग्नात अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर एप्रिल 2021 मध्ये तिने हे नातं संपवत असल्याची घोषणा केली.

अभिनेत्रीने केली घराची तोडफोड 
जना क्रेमरने सांगितलं की, तिने पतीच्या धोक्याचा सामना करण्यासाठी तिच्या घराची बरीच तोडफोड केली होती. ती हसली आणि म्हणाली, 'माझ्या घरातल्या अनेक वस्तू मी तोडल्या होत्या. मी आणि माझ्या मित्रांनी बॅटने घराचा दरवाजा तोडला होता. तसंच, आम्ही माईकचे सर्व Xbox आणि त्याला आवडत असलेल्या सर्व गोष्टी तोडल्या. त्याच्या सर्व कोट पँटवर मी अनेक गोष्टी लिहिल्या होत्या.