दिपवीर सोडा, या सर्व कपल्सच्या विभक्त होण्याच्या आल्यात बातम्या...

या आधीही अनेक कपल्सबाबत अशा वावड्या उठल्या होत्या. बरं ही जोडपी कुणी साईड ऍक्टर किंवा ऍक्टरेस नसून बॉलिवूडमधील बडे ( Big Faces of Bollywood) चेहरे होते

Updated: Oct 5, 2022, 05:37 PM IST
दिपवीर सोडा, या सर्व कपल्सच्या विभक्त होण्याच्या आल्यात बातम्या...  title=

Break Up Story : बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेतील कपल म्हणजे दिपवीर ( DeepVeer) . सध्या दीपिका पदुकोण ( Deepika Padukon And Ranveer Sinh) आणि रणवीर सिंग यांच्या डायव्होर्सच्या बऱ्याच वावड्या उठल्या. मात्र एक रोखठोक वक्तव्य करत दीपिका आणि रणवीर (deepika ranveer divorce) यांनी सर्वांची बोलती बंद केली. इंडस्ट्रीत अशा वावड्या उठणं काही नवीन नाही. कारण या आधीही अनेक कपल्सबाबत अशा वावड्या उठल्या होत्या. बरं ही जोडपी कुणी साईड ऍक्टर किंवा ऍक्टरेस नसून बॉलिवूडमधील बडे ( Big Faces of Bollywood) चेहरे होते.   

Ranveer Singh And Deepika Padukon -

रणवीर आणि दीपिकाबाबत अनेक बातम्या गेल्या काळात समोर आल्यात. दीपिका आणि रणवीर यांच्यात अनेक मुद्यांवरून टेन्शन ( Tension in Ranveer and Deepika Padukon ) निर्माण झालं आहे. दीपिका आणि रणवीर यांच्यात सर्व काही आलबेल नाही. मात्र या सर्व बातम्या केवळ अफवा निघाल्या. कारण कालांतराने दिपवीर हे एकमेकांसोबत खुश असल्याचं समजलं. 

Abhishek Bachchan And Aishwarya Bachchan Rai -

अभिषेक बच्चन (Abhishekh Bachchan ) आणि ऐश्वर्या राय (AIshwarya Rai Bachchan) यांच्या लग्नाला तब्बल 15 वर्ष झाली. मात्र अनेकदा त्यांच्याही वैवाहिक जीवनाबाबत अनेक बातम्या समोर आल्या. बच्चन कुटुंबात घटस्फोट होणार अशा वावड्या उठल्या. मात्र आजही ऐश्वर्या आणि अभिषेक ( Aishwarya And Abhishekh News) एकमेकांसोबत आनंदाने राहतायत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील बॉण्डिंग कायम सकारात्मक असल्याचं पाहायला मिळतं. 

Shah Rukh Khan and Gauri Khan -

शाहरुख खान ( Shah Rukh Khan) आणि गौरी खान ( Gauri Khan)  यांच्याबाबत चर्चा होणार नाही असा दिवस जात नाही. शाहरुख आणि गौरी यांची लव्हस्टोरी (Love Story of Shahrukh and Gauri ) आपल्या सर्वांना ठाऊक आहे. मध्यंतरी शाहरुख आणि गौरी यांच्या नात्यात मिठाचा खडा पडलाय ( relation of shahrukh and guari khab) असं बोललं जात होतं. मात्र या देखील अफवाच निघाल्या. 

Arjun Kapoor and Malaika Arora -

बॉलिवूडमधील आणखी एक चर्चेतील कपल म्हणजे मलायका अरोरा ( Malaika Arora ) आणि अर्जुन कपूर ( Arjun Kapoor) . या दोघांच्या लव्हस्टोरीचे अनेक फोटो सोशल मीडियातून समोर येताना पाहायला मिळतात. मात्र यांच्या नात्यातही सर्व आलेलं नाही अशा बातम्या होत्या. लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र, अचानक यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी इंटरनेटवर भूकंप आला होता. यानंतर मलायकाने स्वतः अर्जुनसोबतचा एक फोटो शेअर करून ( Malaika Shared Photo With Arjun Kapoor)  या बातम्यांना पूर्णविराम लावला.