आर्यनच्या मदतीसाठी पुढे आली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री

शहरूख खानच्या मुलाची होणारी बदनामी पाहाता प्रसिद्ध अभिनेत्रीने उचललं हे पाऊल...

Updated: Oct 5, 2021, 09:04 AM IST
आर्यनच्या मदतीसाठी पुढे आली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री  title=

मुंबई : ड्रग्स प्रकरणी मुलगा आर्यन खानचं नावसमोर आल्यानंतर बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आर्यन खानला एनसीबीने एका रेव्ह पार्टीतून अटक केली आहे. यावेळी त्याच्यासोबत इतर आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मुलाला अटक झाल्यानंतर देखील अद्याप शाहरूखने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण बाहेर आलं आहे. 

बॉलिवूड मधील ड्रग्स प्रकरण बाहेर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड एकत्र आलं होतं. आता देखील प्रसिद्ध अभिनेत्री नफीसा अली सोढी यांनी आर्यनची पाठराखन केली आहे. आर्यनची मदत करा, त्याची बदनामी करू नका... असं आवाहन नफीसा अली सोढी यांनी केलं आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर आर्यनसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पोस्ट शेअर करत नफीसा अली सोढी म्हणाल्या, 'आर्यन एक तरूण मुलगा... त्याच्यासाठी मी प्रर्थना करत आहे. त्याला सध्या मदतीची गरज आहे. त्याची बदनामी करू नका... त्याला #drugskill चं उदाहरण बनवू नका...' त्यांच्या या पोस्टवर शाहरूखच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. 

सध्या नफीसा अली सोढी यांची पोस्ट तुफान व्हायरल होत. एवढंच नाही तर अभिनेता सलमान खान देखील शाहरूखला भेटण्यासाठी त्याच्या निवासस्थानी पोहोचला होता. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि सलमान खान हे एकमेकांचे चांगले मित्र मानले जातात. अशा कठीण काळात सलमान त्याच्या मित्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला.