मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचं मुंबईत निधन झालं आहे. शनिवारी रात्री मुंबईच्या एका रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तारिक शेख हे अभिनेत्री शोमा आनंद यांचे पती होते. तारिक आणि शोमा यांना एक मुलगी देखील आहे. तिचं नाव सारा असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना किडनीचा आजारला झुंज देत होते.
Sad News
Actor director Tariq Shah of serial "Kadwa Sach" and film "Janam Kundali" fame expired today morning at private hospital in Mumbai.
He was husband of Shoma Anand.
May Allah bless the departed soul. #tariqshah #shomaanand omshanti— Viral Bhayani (@viralbhayani77) April 3, 2021
तारिक यांनी 'बहार आने तक', 'महात्मा', 'मुंबई सेंट्रल' सिनेमांमध्ये मुख्य भुमिका साकारली होती. त्यानंतर 'बहार आने तक', 'जन्म कुंडली' या सिनेमांमध्ये दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली. फक्त मोठ्या पडद्यावरच नाही तर त्यांनी छोट्या पडद्यावरील 'कडवा सच' मालिकेत दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम पाहिलं.