Fact Check : मलायका अरोराच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; सेकंड मॅरेज आधीच मलायका अरोरा प्रेग्नंट?

मलायका अरोराने अरबाज खानपासून घटस्फोट घेतला आहे. अरबाज खान आणि मलायका यांना एक मुलगाही आहे

Updated: Jan 7, 2023, 07:12 PM IST
Fact Check : मलायका अरोराच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज;  सेकंड मॅरेज आधीच मलायका अरोरा प्रेग्नंट? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काहि दिवसांपासून मात्र अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. येत्या दिवसांत मात्र मलायका तिच्या प्रेग्नंसीच्या बातम्यामुळे चर्चेत आहे. मात्र ही बातमी समोर येताच यावर तिचा बॉयफ्रेंड अर्जून कपूर (Arjun Kapoor) ने मात्र एक वक्तव्य केलं आहे. जे ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. 

पण ही बातमी तेव्हा समोर आली होती जेव्हा  मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ऑक्टोबरमध्ये लंडनमध्ये वेकेशनला गेले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या मित्रांना याची माहिती दिली होती. त्याचबरोबर ती लवकरच आयुष्मान खुरानाच्या चित्रपटात ती आयटम साँन्ग करताना दिसत आहे. या अफवांमुळे दोघंही खूप नाराज असल्याचं दिसत आहे. 

मलायका अरोराने अरबाज खानपासून घटस्फोट घेतला आहे. अरबाज खान आणि मलायका यांना एक मुलगाही आहे. घटस्फोटानंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.  

बॉलीवूड अभिनेत्री, डान्सर आणि फॅशन दिवा मलायका अरोरा बऱ्याच दिवसांपासून अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अलीकडेच मलायका अर्जुनच्या पहिल्या मुलाची आई होणार असल्याची बातमी समोर आली होती ज्यामुळे मीडियामध्ये खळबळ उडाली होती. मात्र, आता खुद्द अभिनेत्याने हे वृत्त खोटं ठरवत उत्तर दिलं आहे.

मलायका अरोराच्या प्रेग्नेंसीची बातमी अर्जुन कपूरने अधिकृतपणे खोटी ठरवली आहे. यावेळी अभिनेत्याने पब्लिकेशन हाऊसवरही निशाणा साधला होता. त्याने एका पोस्टमध्ये लिहिलं की, ' अजून यापेक्षा तुम्ही कमी पडू शकत नाही आणि तुम्ही कॅज्युअल असल्यामुळे तुम्ही हे केलं आहे. हा रिपोर्टर सतत अशा बातम्या लिहून पळून जातो आणि सततच्या प्रसिद्धीमुळे या बातम्या खऱ्या ठरतात. हे योग्य नाही. आमच्या वैयक्तिक भावनांशी खेळणं थांबवा.'  

याचबरोबर मलायकाने तिच्या गरोदरपणाच्या खोट्या बातम्या प्रकाशित केल्याबद्दल वेबसाइटवर टीका केली आणि हे अतिशय वाईट कृत्य आहे असं म्हटलं. अर्जुन कपूरच्या प्रतिक्रियेचा फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर करत तिने लिहिलं की, "हे अतिशय "घृणास्पद" आणि लज्जास्पद आहे.

पती अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. लवकरच हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जातं. डेटिंगच्या बातम्या समोर आल्यानंतर सुरुवातीला मलायका आणि अर्जुनलाही खूप ट्रोलही करण्यात आलं होतं.