अभिनेत्रीने बॅकलेस ब्लाउजमध्ये दाखवले सौंदर्य; Video पाहून चाहते झाले थक्क

बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहेत. 

Updated: May 31, 2022, 08:19 PM IST
अभिनेत्रीने बॅकलेस ब्लाउजमध्ये दाखवले सौंदर्य; Video पाहून चाहते झाले थक्क title=

मुंबई : बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून त्या नेहमी चाहत्यांशी संवाद साधत असतात. आता एका अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतल्या अभिनेत्रीचं सौदर्य पाहून चाहते थक्क झालेत.  

अभिनेत्री तमन्ना भाटियाने अलीकडेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तमन्ना व्हॅनिटी व्हॅन रूमच्या दारात उभी आहे. यावेळी तिने हिरव्या रंगाची साडी घातलीय. तमन्नान अतिशय खुलून दिसणारा बॅकलेस ब्लाउज आणि हिरव्या साडीत चाहत्यांना घायाळ करतेय.या व्हिडिओच्या मागे 'बडी मुश्कील बाबा बडी मश्किल' हे गाणे वाजतेय. 

पुरुषाच्या गेटअपने बसला शॉक 
दरम्यान व्हिडिओच्या काही सेकंद ती तिच्या सौंदर्याच्या जादूने चाहत्यांची मने जिंकते, पण नंतर ती अचानक माणसाच्या गेटपमध्ये समोर येते.  तमन्नाने साडीत स्वत:ला फ्लॉंट केल्यानंतर तिच्या खोलीचा दरवाजा बंद करते आणि नंतर जेव्हा ती उघडते तेव्हा तिचा लूक पूर्णपणे बदलला दिसतो. तेव्हा ती विग आणि मिशा घातलेल्या पुरुषाच्या गेटअपमध्ये दिसते. या रीलला तमन्ना भाटियाने 'मिस बी अँड हर ब्रो' असे कॅप्शन दिले आहे.

म्हणून घेतला पुरुष गेटअप 
तमन्ना भाटिया अचानक पुरुष का झाली असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ही अभिनेत्री तिचा नुकताच प्रदर्शित झालेला तेलुगु चित्रपट F3 मधला लूक दाखवत आहे. F3 नुकताच २७ मे रोजी प्रदर्शित झाला असून हा एक विनोदी चित्रपट आहे. प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडला आहे.